विस्मयो आनंदवनभुवनी
अयोध्या नगरीचा अवघा आसमंत रंगीत दीप आणि दीपमालांनी प्रकाशमान झाला होता. आकाशातील द्वितीयेचा चंद्र आज जरा जास्तच तेजस्वी जाणवत होता. शरयूच्या तीरावरून येणाऱ्या सुखद गारव्यामुळं वातावरण प्रसन्न वाटत होतं. सर्वत्र उभारलेल्या राहुट्यातून , मंदिरांच्या प्रांगणातून , शरयू नदीच्या किनाऱ्यावरून केवळ आणि केवळ राम धून ऐकू येत होती. […]