नवीन लेखन...

विहीण की मैत्रीण (कथा)

अहो आई आणि ए आई हा फरक तसा नेहमीच राहतो. तरीही या काळातील अहो आई आणि ए आई असा फरक मुलींसाठी तसा कमीच झाला आहे. या लाॅकडाऊनच्या मिळालेल्या वेळेमुळे तो अजून कमी झाला असेल. अशी अपेक्षा आहे.  […]

मैत्रीण आणि प्रेम (कथा)

ओंकार साधारण पस्तीशीच्या आतला तरूण. एका प्रतिथयश साॅफ्टवेअर कंपनीत कामाला. नुकताच प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून बढती मिळालेला. राधा चोवीस वर्षांची तरुण उत्साही मुलगी. त्याच्या टीममधील एक लीडर. काॅलेज संपून तीन-चार वर्ष झाली असतील. अत्यंत हुशार, कामाला सदैव तयार आणि खास करून टीमचे अंतर्गत प्रश्न सोडवायला एक पाऊल पुढे. […]

काटकसर

मंजिरी आणि राघव नुकतच लग्न झालेल एक नवं कोर जोडपं. लग्नला नुकताच महिना होत आला होता. अश्याच एका रात्री दोघे जेवण करून हॉटेलाच्या बाहेर पडले. कार जरा लांब पार्क केली होती म्हणुन फुटपाथच्याकडेने मस्त एकमेकांच्या हातात हात घेऊन अगदी निवांत गाडी कडे जात होते…… […]

अतर्क्य

राधिकाला या नवीन जागेत येऊन आता तीन  महिने झाले होते. राधिकाचा नवरा राजीव बँकेत नोकरीला होता. बँकेचे कर्ज थकवणाऱ्या एका कर्जदाराचे हे घर बँकेने ताब्यात घेऊन लिलाव केला होता त्यातून ते राजीवला मिळाले होते. पनवेल शहरात अगदी मोक्याच्या जागी  ते दुमजली घर होते. […]

तिमिरातूनी तेजाकडे

सिद्धांत आणि मानव खूप जवळचे मित्र. त्यातला मानव अर्धे शिक्षण गावात पूर्ण करून आलेला आणि सिद्धांत अस्सल शहरी मुलगा. दोघेही विज्ञान शाखेचे पदवीधर. खूप दिवसांनी मानव आणि सिद्धांत ऐकमेकांना भेटतात. ते एका हॉटेल मध्ये भेटतात. त्यावेळी त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. […]

सहजीवन

.. आजही टेरेसवर येणारी दोन कबुतरे माझ्या तळहातावरील तांदूळ निर्धास्तपणे खात असतात. पण आधी बोटांच्या पेरांवर चोच मारून धोका नसल्याची खात्री न चुकता करतात. सहनिवासात (Society) राहणार्‍यांशी सलोखा ठेवताना या पाहुण्यांचा सहवासही किती प्रेरणादायी असतो नाही का? सहजीवन म्हणजे आणखी काय असते? […]

विज्या

विजय बारा वर्षाचा होता . गावात याला सगळे विज्या म्हणूनच हाक मारायचे. समुद्राच्या काठावर वसलेले ते छोटेसे कोकणातले मच्छीमारांचे गाव. बहुतांशी कुटुंबांचा उदरनिर्वाह मासेमारीवरच चालायचा. विज्याच्या वडिलांची पण एक होडी होती. गावातली चार पाच लोकं त्याच्या होडीवर कामाला होती. एकत्र कुटुंब असल्यामुळे विज्याच्या घरी माणसांचा राबता खूप होता. विज्याला दोन भावंड होती, नववीत असलेला एक मोठा […]

ती आणि मी – दीपस्तंभ (कथा)

माझेही बरे चालले होते माझी चित्रे खपत होती.परंतु त्या दाढीवाल्याने मात्र पार मार्केट हलवून ठेवले होते.तो दाढीवाला आणि मी दोस्त होतो , परंतु दाढीवाला जबरदस्तच होता. अर्थात तिचाही तो मित्र होता. […]

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १४

पण ही कथा फक्त निशा आणि रोहनची नाहीये…. असे आपल्या परिचयातले अनेक निशा आणि रोहन अचानक गेलेले असतात. पण व्यक्तीशः आपण…..आपण….असं कुणाच्याच बाबतीत परत होवू नये म्हणून काय करतो? या कथेच्या निमित्तानं मला तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत…. […]

प्रवास एका वर्तुळाचा….

ती गाडीतून खाली उतरली पाठोपाठ दोन मुले आणि एक म्हातारी बाई पण उतरली,ती तिची सासू असणार असा मी अंदाज केला होता , ती सासूच होती. ते सर्वजण जवळ आले तेव्हा ती सून हसली माझ्याकडे बघून, मी पण हसले. पण तिच्या सासूला जेव्हा बघितले तेव्हा लक्षात आले ह्या बाईना कुठेतरी आधी, पूर्वी पाहिले आहे, ती सासूपण हसली ,

ती पण माझ्याकडे बघत होती. […]

1 85 86 87 88 89 113
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..