पिंपळ
१) कुलकर्ण्यांचा प्रशस्त वाडा. पंधरा वर्षांची कुमुद आजीला शोधत बागेत आली . आजी नेहमीप्रमाणे औदुंबराच्या झाडाखाली शांत बसली होती. कुमुदला माहीत होतं. आजी औदुंबराच्या झाडाकडेच असणार. आजोबा गेल्याचं दुःख ती पचवू शकत नव्हती. हा औदुंबर आजोबांना प्रिय होता. कुमुदला आजीची अवस्था पहावत नव्हती. तिला पूर्वीसारखी हसीमजाक करणारी हरहुन्नरी आजी हवी होती. कुमुद आजीला म्हणाली, “ आजी […]