केतकी ! (लघुकथा)
सरस्वती विद्यालयाच्या (मुलींची शाळा ) तीन माजली इमारतीच्या पायऱ्यांत, पाचवीतल्या मुलींचा एक घोळका बसला होता. तो घोळका कसल्या तरी गप्पात रंगून गेला होता. त्यात ती, चार दिवसाखाली आलेली नवीन मुलगी, गालावर गोड खळी असलेली, केतकी, पण होती. नवीन असल्यामुळे वर्गातील इतर मुलींच्या फारश्या ओळखी झाल्या नव्हत्या, तरी ती त्या ग्रुपच्या गप्पा एकात होती. […]