नवीन लेखन...

हॉटेलातल्या सूक्ष्म कथा

एक प्रवासाने थकलेल्या आईला सांगितले. आई मी बाहेरुन Do not disturb चा बोर्ड लावतो तू रूममध्ये निवांत विश्रांती घे. आईला क्षणभर वाटले घरच्या बेडरुमला असा बोर्ड लावता आला तर किती बरे झाले असते. दोन हॉटेलात रुम सर्व्हिसला चहा ऑर्डर केला. 15 मिनिटे वाट पाहिल्यावर. एका किटलीत दिमाखात चहा आला. किटली छान होती पण चहा मेला गार […]

पुडिंग (अलक)

विद्या सकाळी उठली. श्वेताला उठवलं.श्वेता ९ वर्षांची तिची गोड मुलगी.श्वेता ब्रश करुन आंघोळीला गेली आणी विद्या किचनमधे आली तिचा डबा करायला.ओट्यावर पोळ्यांचा डबा दिसला आणी तिला आठवलं ,काल रात्री पोळ्या उरल्या आहेत. […]

अलक

मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. दुपारी अडीच तीनची वेळ. कर्जतकडे जाणारी लोकल प्लॅटफॉर्मवर उभी होती. सुटायला वेळ होता आणि सिग्नलही लाल होता. सगळ्यात पुढच्या डब्याच्या सगळ्यात पुढच्या दरवाजात साठीच्या जवळ आलेले प्रभाकरपंत उभे होते. सिग्नल न्याहाळत. […]

विवाह (अलक)

नोंदणी पद्धतीने विवाह करून दोघे घरी आले. त्याचा ओसंडून वाहणारा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. काय करू आणि काय नको, तिच्याशी काय बोलू आणि काय नको असं त्याला झालं होतं. आईने हातात आणून दिलेल्या कॉफीचा घोट घेत तो तिला म्हणाला- “आज मी फार फार खूश आहे…आनंदात आहे.” “का रे?” “मला तुझ्यासारखी बायको मिळाली.” “म्हणजे कशी?” “शोधून […]

विस्मय (अलक)

दार उघडले आणि थंड गार वाऱ्याचा झोत अंगावर आला. शहारून गेलो, केस ताठरले. […]

भय (अलक)

पहाटे आई देवा घरी गेली. वैकुंठात सोपस्कार आवरून घरी परतलो. दार उघडले आणि थंड गार वाऱ्याचा झोत अंगावर आला. शहारून गेलो, केस ताठरले. माझ्यासाठी दार उघडून, कांही तरी पुटपुटत, मोकळे केस सोडलेली, आई देवघराकड़े जात होती. — © अरविंद टोळ्ये

शेतकऱ्याची मूर्ती (अलक)

प्रदर्शनाला अलोट गर्दी झाली होती. तशी ती रोज होत होती .लोंढेच्या लोंढे येत होते आणि , वॉव , क्युट , एक्सलंट असे चित्कारत बाहेर पडत होते. बाहेर पडण्यापूर्वी मात्र सगळी गर्दी अचंब्यानं थांबत होती . कारण तिथे प्रदर्शनार्थ ठेवलेली वस्तू सूक्ष्मदर्शकानं पहावी लागत होती . […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..