कायमस्वरूपी कचरा आगाराची संकल्पना
गावातील कचरा पेकण्यासाठी, नगरपालिकांनी निवडलेल्या जागा म्हणजे गावाबाहेरील, शेतीस निरुपयोगी असलेले भूखंड, खोल खड्डे असलेल्या जमिनी किंवा अुथळ पाणी असलेल्या खाड्या असतात. गावातून गोळा केलेला घनकचरा, या जमिनींवर भराव म्हणून अुपयोगी पडतो. काही वर्षांनी, या जमिनी पूर्ण भरल्या म्हणजे नगरपालिका, घनकचरा टाकण्यासाठी दुसरा अेखादा भूखंड निवडते. हे चक्र, वर्षानुवर्षे अव्याहतपणं चालणं अशक्य आहे. […]