नवीन लेखन...

व्यवस्थापन

जुळ्यांना वाढवताना – नवीन लेख मालिका

… अशा एक ना अनेक प्रश्नांना आम्ही जुळ्यांचे आईवडील सामोरे जात असतो. ओह! तुमचेही हेच प्रश्न आहेत का? तर मग तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं घेऊन येत आहोत आम्ही.. या नव्या मालिकेत.. ‘जुळ्यांना वाढवताना..’ […]

स्पंदन

आज जीवनात कोणताही बदलाव आणायचा असेल तर मनुष्य पहिला प्रश्न विचारतो ‘मीच का ?’ परिवर्तनाची अपेक्षा नेहमी दुसऱ्यांकडून केली जाते. पण ‘ स्वपरिवर्तनानेच विश्व परिवर्तन होते. हे आपण लक्षात ठेवावे. […]

मेंदूवर क्ष-किरण

मानवी मेंदूसारख्या गुंतागुंतीच्या किचकट अवयवाबद्दल आपणास खरंच कितपत माहिती आहे? उत्तर असं आहे – फारशी नाही. मेंदू या अवयवावर आजतागायत सर्वाधिक संशोधन झालेलं आहे आणि अजूनही सुरु आहे. मात्र हातात काही भरीव लागत नाही. शरीराचे अनभिषिक्त सत्ताकेंद्र मेंदू आहे. प्रसंग, परिस्थिती, घटना यांच्याबाबत अहोरात्र माहिती घेऊन त्यांवर तातडीने निर्णय घेणे हे मेंदूचे प्राथमिक कार्य असते. सर्व अवयवांमध्ये सुसूत्रता राखणे आणि शरीराचे कामकाज सुरळीत सुरु ठेवणे यामध्ये मेंदू गुंतलेला असतो. […]

ताण – तणावांचे विषाणू

ताण -तणाव हे आपले पूर्वापार साथीदार आहेत. पिढ्यानपिढ्या ही भावना आपली सांगाती आहे. त्यांच्याशी जसे जमेल तसे जुळवून घेणे हळूहळू अंगवळणी पडते आहे. मात्र ताण -तणाव आता अधिक गंभीर, रौद्ररूप धारण करीत आहेत. आता ते वयोगटांवर अवलंबून नाही की आर्थिक परिस्थितीशी ताण -तणावांना काही देणे -घेणे नाही. ही समस्या आता विश्वव्यापी बनली आहे त्यामुळे त्यावर आता सर्वंकष लसीची गरज कधी नव्हे ते निर्माण झाली आहे. […]

सवयींचे व्याकरण !

स्वभावातून सवयीचा उगम पावतो. लहानपणापासून सगळ्यांनाच बऱ्या-वाईट सवयी लागतात. अगदी बालसुलभ म्हणजे अंगठा चोखणे, नखे कुरतडणे, दिसेल ते तोंडात घालण्याची प्रवृत्ती असणे. ! त्यानंतर खोटे बोलणे, भरभर (अथवा हळूहळू) जेवणे, कोठेही (दिलेल्या) वेळेवर पोहोचणे, गोष्टी/ कामे पुढे ढकलणे, सकाळी उशिरा उठणे आणि ही यादी संपता संपणार नाही. […]

वापरा आणि फेकून द्या

तुम्ही नवा मोबाईल विकत घेता तो किती वर्षे वापरता? नवा टीव्ही, गाडी, फ्रिज , लॅपटॉप , फूड प्रोसेसर, वॉशिंग मशिन विकत घेताना पुढे किती वर्षे ती गोष्ट आपण वापरणार आहोत याचा विचार टिपिकल मध्यमवर्गीय माणूस तर नक्कीच करतो. एके काळी, मोठ्या मुलाचे कपडे छोट्याला वापरायचे आणि नंतर त्यालाही तोकडे पडायला लागल्यावर त्याचे पायपुसणे नाहीतर भानशीरे ( या शब्दाची उत्पत्ती कुणास ठावूक असल्यास सांगावी!) बनवायचे आणि तेही पार फाटून वाट लागल्यावर काही नाही तर पाणी तापवण्याच्या चुलीत विस्तव पेटविण्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा! […]

3M – जपानी संकल्पना

जपान देशाने अनेक तंत्र आणि सक्सेस मंत्र साऱ्या जगाला दिले आहेत हे आपण जाणतोच. ते साऱ्या जगाला पटले आणि कौतुकास पात्र ठरले ते ह्या जपानी नागरिकांच्या उत्तरोत्तर प्रगतीने आणि सातत्याने! ह्या लेखात आपण पाहुया अशाच एका संकल्पने बद्दल. काईझेन हे एक जगप्रसिद्ध असलेले व्यवस्थापन तंत्र आहे. […]

घर ‘बसल्या’ काम !

कार्यालय आणि घर हे दोन महत्वाचे पण वेगळे कप्पे आपले आयुष्य व्यापून टाकतात. दोन्ही ठिकाणे वेगळी, तेथे असण्याच्या वेळा वेगळ्या, जबाबदाऱ्यांचे स्वरूप वेगळे ! काय सामाईक असेल तर – दोन्ही ठिकाणी “आपण” असतो. घरबसल्या काम कदाचित अधिक मोठ्या प्रमाणावर भविष्यात (कोरोना संकटानंतरही) पर्याय ठरू शकेल तो गांभीर्याने हाताळला तर खूप समस्या सुटू शकतील. कदाचित कोरोनाची जगभरातल्या नोकरदारांसाठी ही आनंददायी भेट ठरेल. […]

अहोवा

हा एक सुरक्षितता या विषयावरील लेख आहे ज्यात अपघात होता होता वाचणे या बद्दल चा विचार मांडला आहे. गुगलने स्त्री-दाक्षिण्य या शब्दाचे इंग्लीश मध्ये आणि Near miss accident याचे मराठी मध्ये पराकोटीचे हास्यास्पद भाषांतर केले आहे. इतके विक्षिप्त की त्याची अर्थ-कारणमीमांसा शोधणे मराठी (मराठीच काय कुणाच्याही) बुद्धीच्या पलीकडे आहे. अपघात होता-होता वाचला याला चपखल बसेल असा एकही शब्द न मिळाल्यामुळे आणि गुगल महाराजांनीही मार्गदर्शन न केल्यामुळे त्याचे संक्षिप्त स्वरूप म्हणून अहोवा या संक्षिप्त रूपाचाच (शॉर्ट-फॉर्म) या लेखात वापर करावयाचे ठरविले आहे.
[…]

एकेक दिवा वाटू या !

आपण शेवटचे दमदार हस्तांदोलन कधी केले आहे, आठवतंय? आणि हो, दुसऱ्याला शेवटची घट्ट, उबदार मिठी उसासून कधी मारलीय? म्हटलं तर या छोट्या, नगण्य गोष्टी -इतरवेळी त्यांच्याकडे सहसा लक्षही दिले जात नाही. पण अचानक या क्षुल्लक भासणाऱ्या “सहवासाचे” आवर्तन महत्वाचे ठरले आहे. या “ना स्पर्श” कोरोना पर्वात आपल्याला खिळखिळे करण्याचे सामर्थ्य आहे, हे आत्ता आत्ता लक्षात येऊ लागले आहे. […]

1 3 4 5 6 7 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..