सरकारची धोरणे,वाढते प्रदूषण कमी करण्याचे आव्हान आणि हळूहळू होणारी जनजागृती या मुळे ग्राहक इलेक्टिक वाहनाकडे वळायला नुकतीच सुरवात झाली आहे. हजारो कोटींची गुंतवणूक विद्युतवाहना मध्ये होत आहे. कोव्हिडं चा हा काळ आणि वाहनवर्गाचे संक्रमण लवकरच संपेल आणि पेट्रोल/डिझेल व विद्युत वाहनांना लवकरच चांगले दिवस येतील. ज्या उद्योजकांना वाहन क्षेत्रात व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी, विशेषतः ज्यांना ऑटो डीलर बनायचे आहे त्यांच्यासाठी येते एक वर्ष खूप महत्वाचे आहे. तुम्ही या वर्षात विद्युत दुचाकी वाहनांची डीलरशिप खूप कमी गुंतवणूकीत घेऊ शकता आणि 2025 नंतर येऊ घातलेल्या विद्युत वाहन क्रांतीचा घटक बनून, प्रचंड नफा व स्थैर्य मिळवू शकता. […]