हेलन… नृत्य हेच तिचे व्यक्तीमत्व
ओ हसिना जुल्फोवाली जाने जहा… शम्मी कपूर संगीतकार राहुल देव बर्मनच्या युथफुल ट्यूनवर मोहम्मद रफीच्या आवाजाला नेमके पकडत अंगाला जमतील तितके आळोखे पिळोखे देत बेभान नाचतोय (त्याची ती स्टाईलच आहे) आणि अशातच… ओ अंजाना धुंडती वो परवाना धूंडती हू असे आशा भोसले यांच्या मादक आवाजाचा नेमका सूर पकडून हेलन गाण्यात एन्ट्री करते आणि संपूर्ण पडदाभर नृत्याचा वेगळा आविष्कार दिसतो. हा जणू एक प्रकारचा नृत्याचा सामना. […]