संजीवकुमारने प्रत्येक रोल आव्हान म्हणून स्वीकारला. त्याची लांबी बघितली नाही कारण त्याला आपल्या अभिनयाच्या ताकदिवर पूर्ण विश्वास होता, त्याला दस्तक चित्रपट मिळाला.त्या चित्रपटाला अवॉर्ड मिळाले ( ह्या चित्रपटातील “ हम हे मताए कुचा बाजार की तरहा “ या गाण्यात संजीवकुमारची अगतिकता,चीड द्वेष पाहिली की संजीवकुमार काय चीज आहे हे लक्षात येते फक्त पाच ते दहा सेकंद त्याच्यावर शूट आहे ) कोशिश मध्ये तर एकही वाक्य नव्हते ,जे बोलायचे होते ते डोळे व देहबोलीतून.नया दिन नई रात ह्या चित्रपटासाठी आधी दिलीपकुमारला विचारले होते पण त्याने सांगितले की “ माझ्या पेक्षा संजीवकुमार काम जास्त चांगले करेल.” उलझन चित्रपटांच्यावेळी सुलक्षणा पंडित त्याच्या प्रेमात पडली,पण त्याने नकार दिला. […]