बेन हर (१९६०)
एखाद्या सिनेमाचा आस्वाद करताना त्याचे थिम म्युझीक त्या सिनेमाशी किती एकरुप होउ शकते याचे सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे बेन हर. सिनेमाच्या प्रत्येक फ्रेमला जिवंत करणारे एक विलक्षण पार्श्वसंगीत बेन हर हा सिनेमा पाहताना तुम्ही अनुभवत राहता. इतके की सिनेमा संपल्यानंतरही बरेच तास ते तुमच्या डोक्यातून जात नाही. ते सारे प्रसंग तुम्हाला राहून राहून आठवत राहतात..अगदी तुमच्या स्वप्नातही..ही कमाल मिल्कस रोजाच्या जबरदस्त थीम संगीताची आहे. […]