मनोरंजन
वो, फिर नहीं आते
गेल्याच महिन्यात, १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा झाला. त्या दिवशी फेसबुकवर कृपा देशपांडे यांचा ‘टिम टिम करते तारे’ हा लेख वाचनात आला. त्या लेखात त्यांनी डेजी इराणी, हनी इराणी, सचिन, मास्टर महेश, बेबी तबस्सुम, बेबी फरिदा, बेबी नाझ, मास्टर राजू व ज्युनियर मेहमूद अशा हिंदी चित्रपटातील बाल कलाकारांबद्दल लिहिलेलं आहे. […]
बाॅबी ५० वर्षांची झाली
परवाच्या दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर २०२३ ला – ” बाॅबी ” – ५० वर्षांची झाली…कोण ही बाॅबी ? – असा प्रश्न आज नवीन पिढीला पडू शकतो कारण आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात लव्ह वगैरे सगळं एक व्यवहाराचा भाग असल्यासारखं वाटू लागले आहे पण आज जे साठीत आहेत त्यांना निश्चितच असला प्रश्न पडणार नाही कारण बरीच वर्षे बाॅबीने भुरळ घातली होती…
बाॅबी हा सिनेमा…. […]
अष्टविनायका तुझा महिमा कसा
गणपती संदर्भात वेगवेगळे चित्रपट आले असतील परंतु अष्टविनायक गणपतींचा संदर्भ असलेला तोपर्यंत एकही चित्रपट नव्हता आणि आता असे म्हणावे लागेल आणि अजूनतरी या विषयासंदर्भात कोणी चित्रपट निर्माण केलेला नाही. हे ‘अष्टविनायक’ चित्रपटाचे वेगळेपण म्हणता येईल. […]
मनभावन नूतन
नूतन भारतीय हिंदी सिनेमातील एक आघाडीची नायिका, जन्म ४ जून १९३६. वडील कुमारसेन समर्थ आणि आई शोभना समर्थ, चित्रपट कलेशी जोडलेले. वयाच्या १३ व्या वर्षी तिने ‘हमारी बेटी’ या सिनेमामधून नायिका म्हणून पदार्पण केले. विशेष म्हणजे ह्या सिनेमाची निर्मिती तिच्या आई, शोभना समर्थ यांनी खास तिच्या साठीच केली होती. तिने अभिनय केलेला ‘हम लोग’ हा सिनेमा तिला तिच्या आई वडिलांनी बघू दिला नाही. […]
बाईपण भारी देवा…एक अप्रतिम चित्रपट…
बाईपण भारी देवा हा एक अप्रतिम चित्रपट आहे. या चित्रपटात ( मंगळागौर ) या नृत्याला मध्यभागी ठेवून चित्रपटाची कथा उत्तम गुंफलेली आहे. मनोरंजन करता करता या चित्रपटातून स्त्रियांच्या अनेक समस्या मांडण्याचा उत्तम प्रयत्न केला गेला आहे. […]
रायगडाला जेव्हा जाग येते
रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाच्या पहिला प्रयोगाला ६० वर्षे झाली. या नाटकाचा २६ ऑक्टोबर १९६२ रोजी पहिला प्रयोग झाला. […]
सं. देवबाभळी – एक जिवंत अनुभव
पंढरीचे भूत मोठे , आल्या गेल्या झडपी लागे असं हे विठ्ठलनामाचं भूत, एकदा का मागे लागलं की त्यापासून सुटका नाही. अनेक संतांना या भुताने पछाडलं, त्यातलेच एक संत तुकाराम महाराज. त्यांची पत्नी आवली आणि लखूबाई म्हणजे रुख्मिणी या दोघींवरचं नाटक, सं.देवबाभळी. […]
अनावश्यक भागांच्या मालिका..
आजकाल संस्काराची लक्ष्मणरषा सगळेच पाळत नाहीत. संस्कार करणारी माणसे जरी कमी झाली तरी चित्रपट, वाहिन्यांची ही जबाबदारी ठरतें की त्यांनी त्या माध्यमातून संस्कार करावेत. पूर्वीच्या चित्रपटांनी आम्हाला हसविले, आम्हाला रडविले त्यातून सामाजिक आशय दिला, करमणूक, वैचारिक प्रबोधन केलं ते आज कुठे गेल? विषय आणि आशय नसलेल्या माध्यमातून विषयांची सध्या चलती आहे. कुटुंबासमवेत आज काही पाहताच येत नाही. कुटुंबाकडे, प्रत्येकाच्या समस्ये कडे ही आज पाहता येत नाहीं.जो तो आपल्यात मग्न आहे. […]
‘रंजोगम’ – खय्याम साहेब !
खय्याम साहेब तसे एस-जे, एस.डी, एल-पी किंवा आर.डी. यांच्यासारखे खूप फॕन फाॕलोईंग असणारे संगीतकार नव्हते. तसे त्यांचे नावही फक्त दर्दी कान-सेनांनाच ठाउक आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने चटका लागलाच पण त्याचवेळी त्यांच्याविषयी त्यांच्या संगीताविषयी एवढं भरभरुन दाखवले गेले व लिहीले गेले हे पाहून मनाला खरंच समाधान वाटलं त्यांच्या निधनानंतर मी जे काही थोडे कार्यक्रम पाहिले व लेख वाचले त्यात खय्याम साहेबांची बरीच गाणी उल्लेखली गेली. […]