‘रंजोगम’ – खय्याम साहेब !
खय्याम साहेब तसे एस-जे, एस.डी, एल-पी किंवा आर.डी. यांच्यासारखे खूप फॕन फाॕलोईंग असणारे संगीतकार नव्हते. तसे त्यांचे नावही फक्त दर्दी कान-सेनांनाच ठाउक आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने चटका लागलाच पण त्याचवेळी त्यांच्याविषयी त्यांच्या संगीताविषयी एवढं भरभरुन दाखवले गेले व लिहीले गेले हे पाहून मनाला खरंच समाधान वाटलं त्यांच्या निधनानंतर मी जे काही थोडे कार्यक्रम पाहिले व लेख वाचले त्यात खय्याम साहेबांची बरीच गाणी उल्लेखली गेली. […]