“नितळ” – आयुष्याचा तळ ढवळून टाकणारा आरसा !
दोन तास दहा मिनिटे संगणकाच्या पडद्यापासून हलू न देणारा हा नितांतसुंदर चित्रपट बघून मी भारावलो. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी हा २००७ चा चित्रपट तू-नळीवर आला. ठळक कोडाचे अंश (डाग, पट्टे ) चेहेऱ्यावर बिनदिक्कत मिरवणारी आणि ते स्वीकारलेली डॉ देविका येते तिच्या रानडे नामक डॉ मित्राच्या घरी आणि तिला आपली “भावी” मानताना सगळ्यांची ओढाताण एवढा हा एक दिवसाचा चित्रपट (तरुण पिढी अपवाद, त्यांना तिच्या कोडासकट तिला स्वीकारायला काही अडचण नसते, आणि अर्थातच वृद्ध मंडळी, ज्यांच्या डोळ्यांमध्ये जगाचे असे अनेक अनुभव असतात)! […]