ठाण्यातील नाट्यसंस्था – आदर्शमित्र मंडळ
हिंदी नाट्यस्पर्धेत भाग घेऊन पारितोषिके मिळवणे ही आदर्श मित्र मंडळाची खासियतच. गडकरी रंगायतन सुरू झाल्यावर ठाणेकर कलाकारांनी सादर केलेले पहिले नाटक केशवराव मोरे यांनीच दिग्दर्शित केले होते. […]
हिंदी नाट्यस्पर्धेत भाग घेऊन पारितोषिके मिळवणे ही आदर्श मित्र मंडळाची खासियतच. गडकरी रंगायतन सुरू झाल्यावर ठाणेकर कलाकारांनी सादर केलेले पहिले नाटक केशवराव मोरे यांनीच दिग्दर्शित केले होते. […]
मित्रसहयोग’च्या माध्यमातून आपली रंग-कारकीर्द सुरू करणारे आणि नंतर नावारूपास आलेल्या कलाकारांची यादी मोठी आहे. उल्लेख करायचा झाला तर अशोक साठे, रजन ताम्हाणे, प्रबोध कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी, शिरीष लाटकर, पराग बेडेकर, पल्लवी वाघ, अभिजित चव्हाण, गजेंद्र अहिरे यांचा करता येईल. वसंत कामत, नंदकुमार नाईक, अशोक बागवे, श्रीहरी जोशी, श्याम फडके, शिरीष हिंगणे, ॲड. संजय बोरकर आणि हर्षदा बोरकर हे ‘मित्रसहयोग’चे हक्काचे नाटककार होते. […]
या संस्थेने शासनाच्या नाट्यस्पर्धेत अनेक पारितोषिके मिळविली. यशवंत रांजणकर यांच्या ‘जिद्द’ या नाटकाला दिग्दर्शनाचे पारितोषिक, तर अभिनयाचे प्रथम पारितोषिक चंदा रणदिवे यांना मिळाले. त्यानंतर प्र. के. अत्रे यांच्या ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकात मनोहर कारखानीस, उषा गुप्ते यांना उत्कृष्ट अभिनयाची बक्षिसे मिळाली. ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘कवडीचुंबक’ या व इतर अनेक नाटकांचे प्रयोग सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही सादर केले गेले. अशा रितीने या संस्थेने 50 वर्षांपूर्वीच ठाण्यात नाट्यचळवळ यशस्वीरित्या रुजविली. […]
‘मैत्री पेक्षा थोडं जास्त’…असं जुनं, हळवं नातं … पुन्हा एकदा आयुष्यात येणं ..तेही वयाच्या एका विशिष्ठ टप्प्यावर..आणि त्यामुळे वर्तमानातलं जगणं समृद्ध आणि सुखकर होत जाणं…असं हे ‘मैत्रीपेक्षा थोडं जास्त’ असलेलं खास नातं दाखवणारा चित्रपट ‘सहेला रे’ …. प्लॅनेट मराठी वर १ ऑक्टोबर पासून मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट स्ट्रीम होतोय… मृणाल कुलकर्णी, सुमीत राघवन आणि सुबोध […]
जुन्या काळात नाट्यसंस्थांना ‘नाटक मंडळी’ असेच म्हटले जाई. म्हणजे ‘गंधर्व नाटक मंडळी’, ‘शाहूनगरीवासी नाटक मंडळी’, ‘राजाराम नाटक मंडळी’, असे. त्या काळात नाट्यसंस्था म्हणजे एक कुटुंबच असे. ज्या शहरात नाट्यप्रयोग करायचे तिथे एखाद्या चाळीत, वाड्यात खोल्या भाड्या घेऊन मंडळी उतरायची. नाटक कंपनीच्या त्या ताफ्यात स्वयंपाक करण्यापासून ते डोअरकीपिंग करण्यापर्यंत सगळी कामे करायला माणसे असत. मुख्य नटांचा पगार ठरलेला असे. तो शक्यतो वेळच्या वेळी केला जाई. नटांची तालीम घ्यायला तालीम मास्तर (आजचे दिग्दर्शक हो!) असायचे. […]
कुसुमाग्रजांनी “वीज म्हणाली धरतीला ” (१९७०) मध्ये लखलखणाऱ्या झाशीच्या राणीचे आणि तिच्या विस्तवाला प्राक्तन बांधलेल्या सहेल्यांचे हे घायाळ करणारे वर्णन लिहिलंय. आमचे गुलज़ार महोदय ” नमकीन ” (१९८२) मध्ये असेच तीन निखारे (शर्मिला, शबाना आणि किरण वैराळे) उशाला घेऊन निजणारी वहिदा रंगवितात, पुन्हा चार पक्षिणी ! […]
व्यक्तिमत्त्व विकासासाठी बालनाट्याचा साधन म्हणून उपयोग करून मनोरंजनाबरोबरच संस्कार करण्याचे कार्य ठाणे शहरातील मंडळी करीत आहेत, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे व भविष्यातही बालरंगभूमीला उज्ज्वल भविष्य आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही ही खात्री आहे! […]
सुरुवातीला ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘काका किशाचा’, ‘मुंबईची माणसे’ अशा लोकप्रिय नाटकांचे प्रयोग केल्यानंतर 16 जानेवारी 1965 रोजी डॉ. मधुसूदन शंकर जोशी लिखित आणि श्री. दत्तोपंत काणे दिग्दर्शित ‘हरवले ते गवसले का?’ ही पहिली नवीन नाट्यकृती सादर केली. 1971 साली शशी जोशी लिखित ‘त्रिकोणी प्रेमाची पॉलिसी’ या नाटकाच्या निमित्ताने संस्थेचा रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर करण्यात आला. […]
मी ठाण्यात जन्मले हे माझं अहोभाग्य. कारण मला कलाकार न होण्याला एकही कारण ठाण्याकडे नव्हतं, उलट ही कलावंत कशी होत नाही हे पाहणारेच अवतीभवती होते. कथ्थक नृत्यगुरू डॉ. राजकुमार केतकर. अगदी हाकेच्या अंतरावर यांचे नृत्यवर्ग. गडकरी रंगायतनसारखी वास्तू दोन मिनिटांच्या अंतरावर आणि कलासरगम, मित्रसहयोग यांसारख्या नाट्यसंस्था संधी द्यायला उत्सुक. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions