नवीन लेखन...

मराठी भाषा आणि संस्कृतीविषयी लेख..

श्रावण महिन्यात सणांची बरसात

श्रावण महिना घेऊन येतो आनंद, उत्साह आणि जगण्याची नवी उमेद. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण उत्सवाच्या निमित्ताने सर्वांसह मिळून आनंदाने घालवायला असे सण समारंभ नक्कीच हवे असतात. वर्षभराची ऊर्जा देणारा हा श्रावण महिना आरोग्य,पर्यावरण,संस्कृतीचा सर्वांगीण विचार करणाराच आहे असे म्हणता येईल. […]

बडोद्यातील ‘मुद्रण’ क्रांती

भारतातील लेखक-प्रकाशकांचे सगळ्यात मोठे आधारस्तंभ व आधुनिक भारताच्या इतिहासात सर्वात मोठे प्रकाशक ठरलेल्या सयाजीराव महाराजांनी बडोदा संस्थानात मुद्रण कलेच्या माध्यमातून केलेली ‘ज्ञानक्रांती’ आजच्या ‘ऑनलाईन’ जमान्यात समजून घेणे मार्गदर्शक ठरेल. […]

ह्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी

ह्या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे राजकीय पक्ष मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणू लागले आहेत . त्याचवेळी सर्वच पक्षांच्या बहुतांशी नेत्यांची व अनेक उमेदवारांच्या तोंडची मराठी भाषा कमालीची बिघडू लागली आहे. अनेकांना अशी शंका येते की, आज-काल नेतेमंडळींनी मराठी शिकण्यासाठी गुजराती किंवा उर्दू शिक्षकांच्या खाजगी शिकवण्या लावल्या आहेत की काय? […]

मराठीतील भाषांतरे-रूपांतरे आणि दुर्गा भागवत

दुर्गा भागवतांच्या संशोधनाचे मुख्य क्षेत्र लोकसाहित्याचे. मराठीत भाषांतरित झालेल्या लोकसाहित्याबद्दल दुर्गाबाईंच्या खूप तक्रारी होत्या. मराठीत उत्तम अनुवादकांची वाण तेंव्हाही होतीच. भाषांतरावरून भाषांतरे करणे, संक्षिप्त रुपांतरे करणे, रूपांतर करताना मूळ नावे, स्थळे, घटना इत्यादी बदलून टाकण्याची भ्रष्ट प्रथा महाराष्ट्रात पडली त्याविषयी दुर्गाबाई नाखूष होत्या. या नाखुषीतून त्यांनी आगरकरांच्या हॅम्लेटलाही सोडले नाही. […]

अख‌ईं तें जालें – निर्मितीचा शोध

या प्रपंचाची सुरुवात नक्की कधी झाली ते सांगणे अवघड आहे. कॉलेजमधून घरी जाताना डेक्कनकॉर्नरवरून जाणे व्हायचे. वाटेतला एक ठिय्या म्हणजे श्री. प्रभाकर साळुंखे यांचा लकडीपुलाच्या कोपऱ्यात लागणारा पुस्तकांचा स्टॉल (अजूनही साळुंखे तिथे नेमाने हजेरी लावतात). माझ्या सुदैवाने मला तिथे न. वि. पणशीकर यांनी संपादित केलेली तुकारामगाथा मिळाली आणि तुकाराम समजून घेण्याचे काम सुरु झाले. जेव्हा हे […]

मराठी राजभाषा दिवस – संकल्प

कविवर्य  कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतात. हा दिवस होऊ लागला त्याला आता बरीच वर्षे झाली. आपण वर्षांतून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून जगाला हे सांगतो की, ‘मराठीचा आम्हाला विसर पडला आहे, भाषा दिवस साजरा करणे, केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे या प्रतीकात्मक असल्या तरी आमच्या आवाक्यातील ज्या गोष्टी आहेत. […]

मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा ही आपल्यासाठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वासल्याचे बोल आहेत. कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही . कारण मार्दव, ममत्व हे या मराठी भाषेच्या ठाई कायमच वसलेले असते. दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस ” मराठी भाषागौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. […]

मराठीची महती

मराठी आणि मराठी भाषाभिमान हा विषय निघतो तेव्हा १९२२ साली पुण्यात स्थापन झालेल्या महाराष्ट्र शारदा मंदिराचे व तिथे येणाऱ्या साहित्यिक मित्रांनी स्थापन केलेल्या रवी किरण मंडळाचे सदस्य आणि मराठीचा जाज्वल्य अभिमान असणाऱ्या माधव ज्युलियन याचे नाव प्रकर्षाने डोळ्यापुढे येते. नवीन पिढ्यांचा या नावाशी कितपत परिचय असेल कल्पना नाही. […]

चुकांवर चुका

आम्ही इंग्लिश मेडीयम करत चुका केल्या त्या चुकांवर चुका होता आहेत. त्या कधी थांबणार ? . विषय खूप गंभीर आहे. सर्वानीच गंभीर होऊन काहीतरी चांगला मार्ग काढायला हवा . […]

बांधणी भाषेची आणि दडलेले अंतरंग

मराठी भाषा,भाषेचे उच्चार, लहेजा, त्यामधून डोकावणारं आणि ऐकणाऱ्याला जाणवणारं वेगळेपण, भाषेचे वळसे, वेलांट्या, वळणं आणि त्यामधून बाहेर येणारं पोटातलं या सगळ्याची एक गंमत असते नाही ?
घाबरून जाऊ नका ! मी काही मराठी भाषा आणि तिच्यावर साधक बाधक चर्चा यामध्ये अजिबात शिरणार नाहीय. […]

1 2 3 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..