नवीन लेखन...

मराठी भाषा आणि संस्कृतीविषयी लेख..

वर्‍हाडातली गाणी – ९

काळी चंद्रकला नेसू कशी नेसू कssशी जाईच तेल आणू कशी आणू कss शी जाईच तेल आणल आणल सासूबाईच न्हाण झाल वन्साबाईची वेणी झाली मामाजीची शेंडी झाली उरलेलं तेल झाकून ठेवलं रानोबाचा पाय पडला सासूबाई सासूबाई अन्न द्या दुधभात जेवायला द्या आमच उष्ट तुम्ही खा विडा घेऊन खेळायला जा

वर्‍हाडातली गाणी – ८

सा बाई सू sss सा बाई सू sss बेलाच्या झाडाखाली महादेवा तूsss महादेवा तू कृष्ण पंजरीsss कृष्ण पंजरी खुंटी वरचा हार माझा श्याम पदरीss श्याम पदरी काय करू माय कृष्णानी हार माझा नेलास कि काय ss नेलास कि काय कृष्ण करे मोssर कृष्ण करे मोर चंदनाच्या झाडाखाली पाणी पितो मोर डाव रंगीलाss डाव रंगीला गुलाबाचे फुल […]

वर्‍हाडातली गाणी – ७

आला गं सासरचा वैद्दय हातात काठी जळक लाकूड पायात जोडा फाटका तुटका नेसायचं धोतर फाटक तुटक अंगात सदरा मळलेला डोक्यात टोपी फाटकी तुटकी तोंडात विडा शेणाचा कसा गं दिसतो बाई म्हायरावाणी गं बाई म्हायरावाणी आला गं माहेरचा वैद्दय हातात काठी पंचरंगी पायात जोडा पुण्यशाई नेसायचं धोतर जरीकाठी अंगात सदरा मलमलचा डोक्यात टोपी भरजरी तोंडात विडा लालेला […]

वर्‍हाडातली गाणी – ६

नदीच्या काठी राळा पेरला बाई राळा पेरला एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला एकच कणीस तोडून नेल बाई तोडून नेल सईच्या अंगणात टाकून दिल बाई टाकून दिल सईन उचलून घरात नेल बाई घरात नेल कांडून कुंडून राळा केला बाई राळा केला राळा घेऊन बाजारात गेली बाई बाजारात गेली चार पैशाची घागर आणली बाई घागर आणली […]

वर्‍हाडातली गाणी – ५

काळा कोळसा झुकझुक पाना पालखीत बसला भुलोजी राणा भुलोजी राण्याचे कायकाय (आ)ले सारे पिंपळ एक पान एक पान दरबारी दुसर पान शेजारी शेजाऱ्याचा डामा डुमा वाजतो तसा वाजू द्या आम्हाला खेळ मांडू द्या खेळात सापडली लगोरी लगोरी गेली वाण्याला वाण्या वाण्या सोपा दे सोपा माझ्या गाईला गाई गाई दुध दे दुध माझ्या बगळ्याला बगळ्या बगळ्या गोंडे […]

वर्‍हाडातली गाणी – ४

नंदा भावजया दोघी जणी दोघी जणी घरात नाही तिसर कोणी तिसर कोणी शिक्यातल लोणी खाल्ल कोणी तेच खाल्लं वहिनीनी वहिनीनी आता माझे दादा येतील गं येतील गं दादाच्या मांडी वर बसील गं बसील गं दादाची बायको चोट्टी चोट्टी असू दे माझी चोट्टी चोट्टी घे काठी लगाव काठी घरा घराची लक्ष्मी मोठी

1 10 11 12 13 14 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..