अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात डोकावले तर अनेक मजेशीर गोष्टी लक्षात येतात. या संमेलनाच्या आयोजनातून अनेक योगायोगही जन्माला येत असतात. अशाच काही योगायोगांचा आढावा. पहिली पाच संमेलने ग्रंथकार संमेलने या नावाने भरली. या संमेलनांना स्वागताध्यक्ष नव्हता. १९०८ च्या पुणे संमेलनाला प्रथमच स्वागताध्यक्ष लाभले आणि ते होते वा.गो.आपटे. न्यायमूर्ती म.गो.रानडे १८७८ मध्ये पुण्यात भरलेल्या साहित्य संमेलनाचे […]
अंग्रजीत अे पासून झेड् पर्यंत 26 अक्षरे असल्यामुळे आणि त्यांना काना मात्रा वेलांटया नसल्यामुळे अक्षरानुक्रम पाळणे फार सोपे आहे. पण देवनागरीतील कोशवाङमयात बर्याच अडचणी येतात. देवनागरीतील वेगवेगळे कोश किंवा मराठी पुस्तकांच्या शेवटी असलेली सूची बघितली तर चटकन लक्षात येते की मराठीत अक्षरानुक्रम पाळण्यात अेकसूत्रता नाही. ती आणणे आणि अंग्रजीतून आलेले विज्ञानविषयक किंवा अतर शब्द सामावून घेण्यासाठी […]
बृहन्महाराष्ट्र हा जो शब्द आजकाल सर्वत्र वापरात आहे, त्याबद्दल प्रथमच एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, ‘महाराष्ट्र’ ही एक भौगोलिक, सांस्कृतिक, आणि आतां राजकीयही, संकल्पना आहे ; परंतु ‘बृहन्महाराष्ट्र’ ही केवळ सांस्कृतिक संज्ञा आहे. भूगोलाच्या दृष्टिकोनातून बघायचें झाल्यास, बृहन्महाराष्ट्रीय म्हणजे, ‘ज्यांनी किंवा ज्यांच्या पूर्वजांनी महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात स्थलांतर केलेले आहे, असे महाराष्ट्रीय जन’, असें म्हणायला हरकत नाहीं. तेव्हां, बृहन्महाराष्ट्राबद्दल चर्चा करतांना, आधी आपण महाराष्ट्र, महाराष्ट्रीय व महाराष्ट्रीयत्व या शब्दांचा विचार करायला हवा. […]
मराठीतील अक्षरचिन्हे, स्वरमाला आणि व्यंजनमालेविषयी एक विवेचन…. पारंपारिक वर्णमाला : स्वरमाला आणि व्यंजनमाला पारंपारिक स्वरमाला : अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं (अुच्चार…अनुस्वार) अ: (विसर्ग, नेहमीचा सामान्य अुच्चार…. अहा..), ऋ (र्हस्व आणि दीर्घ. दीर्घ ऋ संगणकावर मला टाअीप करता आला नाही), लृ (र्हस्व आणि दीर्घ) असे अेकूण १६ स्वर आहेत. पारंपारिक व्यंजनमाला : कंठ्य (Guttural) :: क ख ग […]
कृष्णावळ – अर्थाच्या दृष्टीने अतिशय लक्षणीय असा हा शब्द आजकाल कोणीही वापरत नाही. कृष्णावळ चा अर्थ कांदा ! कांद्याला असे म्हणण्याचे कारण गंमतशीर आहे. कांदा उभा चिरला, तर तो शंखाकृती दिसतो आणि आडवा चिरला, तर तो चक्राकृती दिसतो. शंख आणि चक्र ही दोन्ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत. ही दोन्ही आयुधे एका कांद्यात पहायला मिळतात, म्हणून गमतीने कांद्याला […]
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त सहा वर्षांपूर्वी, १ मे २०१० रोजी लिहिलेलें हें काव्य आजही कालानुरूपच (रेलिव्हंट) वाटतें. १. सुवर्णमहोत्सव हा सुवर्णाक्षरांनी लिहा क्रमांक पहिला’ फलक वाहा असूं देत क्रम नऊ-दहा. ‘महाराष्ट्र हें राज्य महा’ फलद्रूप होईल मंत्र हा अनंत वाट पहा ।। २. नंभर-नंबरी सोनें नच हें , फक्त मुलामा वरचा घोडा-पहिला, कधीच झाला शर्यतीत शेवटचा […]
पु.ल.देशपांडे यांच्या लेखावर आधारित खालील उतारा ‘मी मराठी’ असल्याच्या कडव्या अभिमानाने व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रकाशित केला होता. तो आपल्यासाठी पुन्हा एकदा. महाराष्ट्र दिनाच्या सर्वचजण एकमेकांना शुभेच्छा देतात. परंतू या शुभेच्छा देताना काही गोष्टींची, विशेषतः महाराष्ट्राच्या ‘मराठी परंपरे’ची, आठवण करून देण्यासाठी खालील उतारा लिहीला आहे. थोडा वेळ काढून जरूर वाचावा ही विनंती.. ‘..मुघल काय किंवा इंग्रज […]
दरवर्षी महाराष्ट्र दिन अणि शिवजयंतीला हमखास वाजणारे महाराष्ट्र गौरव गीत म्हणजे “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे. कवी राजा बढे यांनी लिहिलेलं आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत शाहिर साबळे यांनी त्यांच्या खणखणीत आवाजानं अजरामर केलं. नंतरच्या काळात अनेकांनी ते गायलं पण शाहिर साबळे यांची सर कोणालाच आली नाही. […]
महाराष्ट्राचा गौरव करणारी अनेक गीते अनेक कवींनी लिहिलेली आहेत. यातली काही निवडक महाराष्ट्र गीते या मालिकेत सादर करत आहोत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेलं हे एक महाराष्ट्रगीत. […]
गेले काही दिवस रस्त्यारस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावलेली मोठमोठी होर्डिंग बघतो आहे. गुढीपाडव्याचा मनसेचा मेळावा शिवाजी पार्कला होणार आहे आणि त्याचं आमंत्रण देणार्या या होर्डिंग्सवर राजभाषेची आठवण करुन दिलेली आहे. लवकरच महाराष्ट्र दिवस येत आहे. मोठा गाजावाजा करत तो साजरा होईल. दर वर्षी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी जागतिक मराठी दिवस पाळला जातो. तोसुद्धा थाटामाटात पार पडतो. कार्यक्रम होतात, […]