नवीन लेखन...

मराठी भाषा आणि संस्कृतीविषयी लेख..

बाजीराव-मस्तानी आणि मराठी अलंकार

बाजीराव-मस्तानी हा बिग बजेट हिंदी चित्रपट यावर्षीच्या चित्रपटांमधील एक भव्य-दिव्यपणे प्रदर्शित झालेला आहे. यात बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेचे चित्रण केले आहे. मराठी अलंकार हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य आहे. या पेशवेकालीन अलंकारातून त्यावेळच्या संस्कृतीची ओळख होते. या अलंकारांच्या निर्मितीसाठी पुण्याच्या सुप्रसिद्ध “पी एन गाडगीळ अॅन्ड सन्स” यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली आणि ती त्यांनी सार्थपणे […]

शिवराय आणि बाजीरावाचा महाराष्ट्र

दादरा, नगर हवेली, वापी या भागात मी फिरलो आहे. चर्चगेट पासून ते वापी पर्यंत महाराष्ट्र गिळला गेला आहे. उंबरगाव महाराष्ट्रात सामील करण्याचा लढा संपला…. इतिहास जमा झाला. बेळगाव, कारवार, निपाणीचे लोक महाराष्ट्रात येण्यासाठी महाराष्ट्राच्या दरवाजावर अनेक वर्षे टक्कर देत आहेत. त्यांचा कपाळमोक्ष झाला. कानडी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खावून त्यांची हाडे पीचली आहेत पण अजूनही ते लढत […]

मराठीचा पहिला ग्रंथ ‘विवेकसिंधू’ आजही उपेक्षाग्रस्त

मराठीतला पहिला ग्रंथ कोणता असा प्रश्न विचारला की पहिले उत्तर असते “ज्ञानेश्वरी”. मात्र ज्ञानेश्वरीच्याही आधी १०० वर्षांपूर्वी मराठीतला पहिला ग्रंथ लिहिला गेला तो होता “विवेकसिंधू” आणि त्याचे लेखक होते “मुकुंदराज”. ज्ञानेश्‍वरीच्या मोठेपणाला आव्हान देण्याचे कारण नाही. परंतु ज्ञानेश्‍वरी मराठीचा आद्यग्रंथ नक्कीच नाही असे मुकुंदराजांच्या अनुयायांचे म्हणणे आहे. मराठी जगतेय की मरतेय यावर तावातावाने चर्चा करणार्‍या आणि […]

मराठीतली विलोमपदे

Palindrome म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार , वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना जी शेवटाकडून सुरूवातीकडे वाचत गेलं तरी बदलत नाही. इंग्रजीत Palindrome ची रेलचेल आहे. पण मराठीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. लहानपणी तर दोन तीनच माहित होते. १) चिमा काय कामाची २) ती होडी जाडी होती. ३) रामाला भाला मारा. पण अलिकडे कळलं की मराठीत Palindrome ला ‘विलोमपद’ […]

लोकसत्ताकारांची वैचारिक दिवाळखोरी….

लोकसत्ताच्या ८ मार्च २०१६ च्या अग्रलेखात झुंझार पत्रकार श्री गिरीश कुबेर यांनी माझं नाव न घेता मला – “कोणी तरी रिकामटेकडा संगीतकार कलात्मक झटापट आणि माल-विक्रीकौशल्याची खटपट करीत अभिमानगीत गात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो.” – म्हणून संबोधलंय! कुबेरांना ‘रिकामटेकड्या संगीतकारांवर’ अग्रलेख लिहायची वेळ आली हे पाहून मला त्यांची कीव आली. असंही वाटलं की रिकामटेकडेपणाचे फायदे कुबेरांना लहानपणीच […]

औचित्य जागतिक मराठी भाषा दिनाचे!

कविवर्य श्री विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. हाच दिवस महाराष्ट्र शासनाने मराठी राजभाषा दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचे घोषित केले आणि जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेत हा दिवस आपण ‘जागतिक मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करतो. समस्त मराठी जनांना ‘जागतिक मराठी भाषा दिवसाच्या’ हार्दिक शुभेच्छा..! भाषेचा प्रश्न केवळ महाराष्ट्रालाच […]

“बोला, मराठी बोला..”

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..!” या ओळींचा आज महापूर येणार..आजचा मराठीचा ‘दिन’ केला की आपले कर्तव्य पार पाडले एवढीच त्यामागील भूमिका.. मराठीतून बोलणं मागासलेपणाचं लक्षण  आहे असं आपण मराठी माणसांनीच ठरवून टाकलंय त्यामुळे, ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ या ओळीला एक सुंदर ओळ या पलीकडे काहीच अर्थ उरत नाही. या ओळीत […]

ई-साहित्य संमेलन – मनोगत

रेणुका आर्ट खुले ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे हे तिसरे वर्ष आहे. पहिल्या साहित्य संमेलनात माझा सहभाग लक्षनिय होता पण दुसर्‍या साहित्य संमेलनात मनात असतानाही सहभागी होणे मला शक्य झाले नव्हते. पण तेंव्हाच तिसर्‍या साहित्य संमेलनात आपला सहभाग असायलाच हवा असं मी मनाशी पक्क ठरवलं होत. त्यामुळे या तिसर्‍या ई-साहित्य संमेलनातील काही उपक्रमात मी सहभागी झालो. खरं म्ह्णजे […]

मराठीसाठी किमान एवढंतरी करुया…..

चला तर मग यापुढे आपण मराठीचा संगणकावर जास्तीत जास्त वापर करुया. मराठीतच इ-मेल लिहिण्याचा, पत्रव्यवहार करण्याचा आणि फेसबुकवरही मराठीत लिहिण्याचा संकल्प करुया. किमान दहा मेल्सपैकी एक आणि फेसबुकवरच्या दहा पोस्टपैकी एक एवढं तर आपल्या मायबोलीसाठी आपण करु शकतो ना?
[…]

संयुक्त महाराष्ट्राची दुर्दशा

१९६० साली यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश दिल्लीहून आणला असे म्हणतात. त्यासाठी १०५ हुतात्म्यांना रक्त सांडावं लागलं. मोरारजी देसाईंसारख्या महाराष्ट्रद्वेष्ट्या माणसाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेक विघ्नं आणण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या पिढीतील अनेकांना हा इतिहास माहित नसेल. आज चित्र असं आहे की आपला हा संयुक्त महाराष्ट्र मराठी माणसाचा राहिला आहे की नाही याचीच शंका यावी. गेल्या […]

1 13 14 15 16 17 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..