जानेवारी महिना सुरु झाला. आता लवकरंच मराठीचा उत्सव साजरा करणार्यांच्या उत्साहाला भरती येईल. जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने विविध घोषणा सुरु होतील. राजकीय भाषणंही होतील. दरवर्षी हेच चित्र दिसतं, वेगळ्या सजावटीत सजवलेलं. जागतिक मराठी दिन साजरा करताना मराठी भाषा बिचारी दीनवाणी होतेय याकडे आपण कधी बघणार? महाराष्ट्रातील आस्थापनांमधून मराठीचा वापर अनिवार्य करण्यासाठी अनेक कायदे आणि नियम बनवले […]
यादवकाळात महानुभाव व वारकरी या पंथांनी मराठीचा प्रसार करण्याची मोलाची कामगिरी पार पाडली. हे कार्य आजही सुरुच आहे. महानुभाव पंथातील चक्रधरस्वामींशी संबंधित `लिळाचरित्र (१२३८)’ हे मराठीतील आद्य साहित्याचे महत्त्वाचे उदाहरण आहे. त्यानंतर संत ज्ञाानेश्वरांनी `भावार्थदीपिका’ अर्थात `श्री ज्ञानेश्वरी’ लिहिली. वारकरी पंथातील संत कवी एकनाथ (१५२८ ते १५९९) यांनी भावार्थ रामायणाद्वारे मराठीतून समाजोपयोगी संदेश दिले. त्यानंतर संत […]
सुमारे पंधरा-सोळा वर्षापूर्वीची ही गोष्ट.त्यावेळी माझी मुलगी इयत्ता पहिलीत होती.तिला ‘माझी आई’ह्या विषयावर पाच ओळी लिहायला सांगितले होते,व तिने काय लिहायचे हे तिच्या वर्ग-शिक्षिकेने वर्गात फळ्यावरच लिहून दिले होते. फळ्यावरची आई,माझ्या मुलीच्या आई सारखी नव्हती! म्हणून तिने ‘आपल्या आई’ विषयी पाच ओळी लिहिल्या!! वर्ग-शिक्षिकेला अर्थातच राग आला! व फळ्यावरचीच आई सर्वांनी लिहिली पाहिजे असा आग्रह केला. […]
कोणत्याही ग्राहकोपयोगी वस्तूंची उदा. तेल – साबण, खाद्यपदार्थांची जाहिरात करताना त्या वस्तूच्या शुध्दतेवर नेहमीच भर दिलेला आढळतो. कारण शुध्दतेला आपण नेहमीच अनन्य साधारण महत्त्व देतो. मग ती चारित्र्याची असो, विचारांची असो किंवा वस्तूंची असो. पण एका बाबतीत मात्र हा “शुद्धतेचा नियम” सर्रास धुडकावून लावलेला दिसतो. आणि ती गोष्ट म्हणजे लेखनातील, उच्चारातील शुद्धता. शुद्धलेखन म्हणजे जुन्या पिढीने […]
मराठी माणसाची रित लय भारी त्याच्या वागण्याची रितच कांही न्यारी ……..कुणी म्हणतसे …….त्याला खेकडा ………तर कुणी म्हणे ……..हा अपुला बापडा करीतसे गोष्टी फार मोठ्या मोठ्या धाव असे कुंपनापर्यंत फार छोट्या छोट्या ……….व्यवहार करताना ……….भावनेला तो मध्येमध्ये आणि ……….फायद्याच्या गोष्टींवर ……….सोडून देई पाणी भावना जेव्हा आड येई तेव्हा पैसा त्याचा जाई पैशाला पैसा खेचतो याची जाण त्याला […]
५ सप्टेंबर २०१५ रोजी संपन्न होणार्या विश्व साहित्य संमेलनानिमित्त…… सोपी मराठी … प्रवाही मराठी … अुत्क्रांत मराठी … समृध्द मराठी…. अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ मराठीच्या आद्य लिपीकारांनी, अ ला काना लावून तयार झालेला आ स्वीकारला …… मराठीच्या आद्य लिपीकारांनी अ ला ओकार लावून तयार झालेला ओ स्वीकारला ….. मराठीच्या आद्य […]
27 फेब्रुवारीच्या जागतिक मराठी भाषा दिवसानिमित्तानं…. सोपी मराठी … प्रवाही मराठी … अुत्क्रांत मराठी … समृध्द मराठी…. :: मराठी भाषेचे अुत्क्रांत स्वर पारंपारिक स्वर : अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं (अुच्चार…अनुस्वार) अ: (विसर्ग, नेहमीचा सामान्य अुच्चार…. अहा..), ऋ (र्हस्व आणि दीर्घ. दीर्घ ऋ संगणकावर मला टाअीप करता आला नाही), लृ […]
आता स्वत:च्या लेखनासाठीही संगणकाचा किंवा आयपॅड, आयफोन किंवा तत्सम सुविधांचा वापर करावा लागतो. संगणकावर किंवा त्या त्या अुपकरणांवर जे फॉन्टस् बसविलेले असतात, त्यानुसारच लेखन करावं लागतं. त्यामुळे शुध्दलेखनाचे बाबतीत बर्याच तडजोडी करणं अपरिहार्य असतं. फॉन्टसाठी लागणारं सॉफ्टवेअर घडविणारे तज्ज्ञ आर्थिक गणितही मांडतात. जे खपतं, विकलं जातं किंवा ज्याला जास्त मागणी असतं, असंच सॉफ्टवेअर बाजारात येतं. शुध्द […]
कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी प्रतिवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! […]
आपल्या देशात फेब्रुवारी महिना जवळ आला की तरूणाईला वेध लागतात ते व्हॅलेन्टाईन डेचे अर्थात जागतिक प्रेम दिनाचे. ह्ल्ली प्रेमात पडलेल्यांना, प्रेमात पडू इच्छिणार्यांना आणि प्रेमात पडून लग्न झालेल्यांसाठी व्हॅलेन्टाईन डेच महत्व इतरांपेक्षा थोड अधिक असल्याच जाणवत. प्रेमभंग झालेल्यांसाठी, प्रेमात धोका खाल्लेल्यांसाठी, प्रेमावर विश्वासच नसलेल्यांसाठी आणि प्रेमाकडे अधिक डोळ्सपणे अथवा बुध्दीपूर्वक पाहणार्यांसाठी या दिवसाच महत्व तितकस नसत. […]