टीप – १९९०च्या दशकाच्या मध्यावर , वडोदरा — बड़ोदा — येथें भरलेल्या ‘गुजरात मराठी साहित्य संमेलना’त, प्रस्तुत लेखकानें हा ‘पेपर’ — प्रबंध — वाचला होता. आज पंचवीसएक वर्षांनंतर, त्यावर, आजच्या परिस्थितीनुसार भाष्य करण्यांसाठी एक नवीन लेख यथावकाश लिहिला जाईल. तूर्तास, ही पुनर्भेट.. […]
“इंग्रजी बोलता येत नसेल तर लाज बाळगण्याचे काहीच कारण नाही” कारण “लाज त्याने बाळगावी ज्याला स्वतःची मातृभाषाच येत नाही.” सतत इतरांना फुकटचे सल्ले देताना जर कुणी म्हणत असेल की, मराठी भाषा टिकवा तर त्यांना माझे इतकेच सांगणे आहे की, मराठी भाषा टिकवा नव्हे ! तर आपण सर्वांनी मिळून टिकवूया असेच म्हणावे लागेल. […]
यंदाच्या यवतमाळात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नामवंत कवयित्री अरुणा ढेरे यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे मराठी संमेलनाला लागलेला वादाचा शाप यावेळी पुसला जाणार, असे वाटत असतानाच उद्घाटकांच्या निमंत्रणावरून संमेलनाच्या सहा दिवस आधी निर्माण झालेल्या वादाने सगळ्या उत्साहावर पाणी फिरवले आहे. […]
अ पासून अ: पर्यंतचे बारा स्वर आणि क पासून क: पर्यंतचा बारा व्यंजनांचा संच असतो म्हणून देवनागरी वर्णमालेत बाराखडी आहे असं समजतात. अिंग्रजीच्या आक्रमणानंतर, अॅ आणिऑ या स्वरांची तसंच कॅ अणि कॉ वगैरे व्यंजनांची सोय करणं आवश्यक होतं. या दोन अक्षरचिन्हांचा समावेश केला की देवनागरीची चौदाखडी होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, १९२४ च्या सुमारास भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली. त्यात थोडी लिपीशुद्धीही होती. त्यांची तर्कशुध्द विचारसरणी म्हणजे….क ला वेलांटी […]
महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने नीटची परीक्षा देत असताना परीक्षा अर्ज भरतानाच मराठी ही उत्तराची भाषा निवडण्याची काळजी घ्यावी असे केल्यास मिळणारे मोठे यश पुढील वर्षी निकाला नंतर मला कळवावे हे आवाहन ! […]
नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आणि विदर्भाची राजधानी. नागपूरची मराठी हिंदीमिश्रित आहे. नागपूरहून यवतमाळला आलं की या मराठीचं स्वरूप बदलतं. बुलढाण्यातली मराठी मात्र या दोन्हीपेक्षा आणखीनच वेगळी आहे. बुलढाण्यातल्या बोलीतही हिंदी शब्दांचा सर्रास वापर केला जातो. प्रमाण मराठीपेक्षा इथली बोली फार वेगळी आहे. […]
२० ऑगस्ट २०१८ च्या ‘लोकसत्ता ( पुणें आवृत्ती)मधील बातमीद्वारें सई परांजपे यांचें भाषेबद्दलचें मत वाचलें ; तसेंच २१ऑगस्टच्या लोकसत्तातील ‘लोकमानस’मध्ये या विषयावरील विनित मासावकर व श्रीनिवास जोशी यांची मतेंही वाचनांत आली. ( एक स्पष्टीकरण : सई परांजपे यांची चर्चात्मक मुलाखात मी प्रत्यक्ष पाहिलेली-ऐकलेली नाहीं. त्याबद्दल ‘लोकसत्ता’मध्ये आलेल्या बातमीचाच संदर्भ मी येथें देऊं शकतो). सई परांजपे यांच्याबद्दल […]
शासन व्यवहारात मराठी भाषेच्या सक्तीच्या वापरासंबंधी मध्यंतरी बातम्या प्रकाशित झाल्या. यात खरं नेमकं काय आहे ? आदेश म्हणजे order , परिपत्रक म्हणजे circular , ताकीद म्हणजे warning , शासन निर्णय म्हणजे Government order ( प्रत्यक्षात तो शब्द हवा Government Resolution किंवा Administrative Order ) …आणि या प्रत्येकाचे अर्थ वेगळे आहेत शिवाय त्या प्रत्येक शब्दाला वैधानिक मूल्य आहे आणि अंमलबजावणीच्या ‘तर्हा’ही वेगळ्या आहेत हे माहिती असल्यानं संभ्रमच निर्माण झालं . […]
आमची मालवणी फटकळ (सभ्य भाषेत स्पष्टवक्ते) म्हणून प्रसिद्ध. पण एक सागतो, फटकळ माणसाच्या मनात काही नसतं. जे आहे ते बोलून मोकळं होणार, मनात काही ठेवणार नाही. हे या भाषेचं वैशिष्ट्य मालवणील् समुद्राने बहाल केलंय. समुद्र कसा, पोटतला कचरा पुन्हा किनाऱ्यावर आणून टाकतो, अगदी तसंच. इथे ‘मुतण्या’ला ‘मुतणं’च आणि ‘हगण्या’ला ‘हगणं’च म्हणणार. […]
हल्ली हा जुना मुद्रा राक्षस मोबाईलवर भेटू लागलाय. पुन्हा पुन्हा आणि वारंवार. मुद्रा राक्षस हे नांव सर्व काम छपाईच्या मशिनवर व्हायचं त्या काळातलं आहे. सध्या टायपिंगचा काळ असल्याने याला ‘टायपो डेमाॅन’ म्हणावं का, की त्याला आणखी कुठलं मराठी नांव द्यावं हे कळत नाही. […]