दळणवळणाची अपुरी साधने आणि शेतीवर पोट असलेल्या या कलावंतांने अखेरपर्यंत कलेची कास सोडली नाही. काही वर्षांपूर्वीच पडद्याआड गेलेले बाबी नालंग आणि बाबी कलिंगण हे दोन दशावतारी कलेचे शिलेदार होते. “श्री. बाबी कलिंगण यांना राज्यस्तरीय लोककला पुरस्काराने गौरविण्यात आले होते “.सिंधुदूर्गात दशावतारी म्हणजे ” रात्री राजा आणि सकाळी कपाळावर बोजा ” अशी स्थिती एके काळी होती. त्या वेळपासून लोककलेची सेवा हाच परमधर्म असे समजून हा कलाकार राबला त्याची शासनाने दखल घेतली हे बरं झालं. […]
एका ओळखीच्या मराठी कुटुंबाच्या घरी गेलो असतांना त्यांचा गोड लहान मुलगा दिसला. त्याला जवळ घेऊन थोडी मस्ती करतांना त्याला त्याच्या वर्गातील एखादी गोष्ट सांगण्यास सांगितले … लगेच त्याच्या “मम्मीने” मागून त्या मुलाला सुचना केली “टेल स्टोरी इन इंग्लिश” ….. […]
माझ्या छंदांच्या निमित्ताने स्वच्छंद भटकताना गेली कित्येक वर्षे माझी पुण्याला नियमित भेट असतेच. तसा मी जन्माने – कर्माने पूर्ण मुंबईकर. कित्येक वर्षांपूर्वी दादरमध्ये रानडे रोडवर सहकुटुंब उभे राहून माझ्या वडिलांनी प्रबोधनकार ठाकऱ्यांबरोबर गप्पा मारल्या आहेत. मुंबईमध्ये आचार्य अत्रे, सेनापती बापट, श्री.ना,पेंडसे, विंदा करंदीकर, अप्पा पेंडसे ते मुंबईत येणाऱ्या अभिनेते चंद्रकांत,सूर्यकांत, राजा गोसावी,शरद तळवलकर अशा कितीतरी थोर […]
आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘मराठी आपली आई,धर्म आपली माता.आपण खरे मातृपूजक आहोत. दुसऱ्याच्या मातेची निंदा करणारे नव्हेत.’ आपली मराठी भाषा किती ओजस्वी,प्रसादपूर्ण,सहजबोधआहे हे यशवंतराव चव्हाण असं समाजातून सांगतात. ‘मराठीत भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांची जुळणी पहा कशी आपोआप सहज होऊ लागते.तुम्ही आपल्या भाषेवर अपार प्रेम करावं, नाहीतर तुमची ऐनवेळी बोलताना फजिती होईन! आचार्य विनोबांनी देवनागरीचा लिपी म्हणून […]
एक होतं गाव. “महाराष्ट्र” त्याचं नाव. गाव खूप छान होतं, लोक खूप चांगले होते. “मराठी” भाषा बोलत होते, गुण्यागोविंदानं नांदत होते. त्यांचं मन खूप मोठ्ठं होतं. वृत्ती खूप दयाळू होती. दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे. आल्या-गेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे, महाराष्ट्रात होता एक भाग. “मुंबई” त्याचं नाव. मुंबईसुद्धा छान होती; महाराष्ट्राची […]
मोल्सवर्थचा मराठी – इंग्रजी शब्दकोश (१८३१) ऐकूनही माहीत नाही असा मराठी माणूस सापडणं कठीण. पण हा मोल्सवर्थ नेमका कोण हे माहीत असणारी मराठी माणसंही तशी कमीच. मोल्सवर्थची मराठी-इंग्रजी डिक्शनरी प्रथम १८३१ मध्ये प्रकाशित झाली. तिची दुसरी सुधारित आवृत्ती १८५७ मध्ये छापली गेली. आजही सुमारे १००० पानांचा मोल्सवर्थचा हा शब्दकोश मराठीतला सर्वांत मोठा शब्दकोश आहे. महाराष्ट्रातल्या न्यायालयात जेव्हा […]
शुद्ध मराठीचा आग्रह हा दुराग्रह होऊ नये, कारण त्यामुळे कदाचित सामान्य माणूस भाषेपासून दूर पळण्याचा धोका आहे. आजची तरुण पिढी अशुद्ध मराठी लिहिते असा नेहमीच आरोप केला जातो. पण असे का याचा विचार कोणी केलाय का? […]