श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ७
नो शक्यं स्मार्तकर्म प्रतिपदगहनप्रत्यवायाकुलाख्यं श्रौते वार्ता कथं मे द्विजकुलविहिते ब्रह्ममार्गानुसारे । तत्वऽज्ञाते विचारैः श्रवणमननयोः किं निदिध्यासितव्यं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥७॥ आपल्या ठिकाणी उपासनेशी संबंधित कोणतीही पात्रता नाही अशा स्वरूपात पूज्यपाद आचार्यश्री आपल्या अज्ञानाचे भगवंताच्या चरणाशी प्रदर्शन करीत आहेत. वेगवेगळ्या शास्त्र ग्रंथात उपासनेचे नियम सांगितलेले असतात त्यांना श्रुती प्रतिपादित म्हणजे श्रौत […]