नियती अनेक गाेष्टी घडवून आणते. तिघेही केंद्रात असते तर त्यांच्या निधनाचे हे धक्के सरकारसाठी सुरळीत कामकाजाच्या दृष्टीने समस्या हाेऊ शकले असते. पर्याय शाेधताना आणि गाडे रुळावर आणताना त्रास झाला असता. कुठल्या अंतस्थ शक्तीने त्यांना राेखले, हे परमेश्वर जाणाे. पण आपल्यामुळे देशाचे नुकसान हाेता कामा नये, याचा आदर्शपाठ या तिघांनीही घालून दिला. ताे नव्या पिढ्यांसाठी अनुकरणीय ठरेल. […]
गोव्यात गावागावात जेवढी म्हणून देवस्थाने आहेत, तेवढाच नाट्यमंडळांचाही आकडा आहे. गोव्यातील नाट्यपरंपरा कधीपासून सुरू झाली, याला अनेकांचे दुमत आहे. परंतु “अहिल्योध्दार” नाटकाच्या मूळप्रतीवरून एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच गोमंतकीय रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली असावी असे अनेक जाणकारांचे मत. गोव्याचे संतकवी म्हणून ओळखल्या जाणार्या कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकर लिखित “अहिल्योध्दार” या नाटकाच्या प्रतीवरून आणि त्यांंच्या इतर लिखाणावरून जाणकारांनी कृष्ण जगन्नाथ […]
आपण जोवर सबुरीनें घेत आहोत, तोवर दहशतवादी ‘मऊ लागलें म्हणून कोपरानें खणणार’च ! . पण जर त्यांना दिसलें की आपण रिटॅलिएट करायला दृढसंकल्प आहोत, तर तें मोठें डिटरंट ठरेल. अशा वेळी, हा पत्रकार सबुरीनें घ्यायला सांगतो, हेंच अनाकलनीय आहे ! […]
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांनी असें म्हटलें आहे की ते पूर्वी ‘संघा’चे स्वयंसेवक होते. या कारणावरून म्हणे, विरोधी पक्ष त्यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार आहे. अहो, बहिष्कार टाकायचाच असेल तर ज़रा चांगलें कारण तरी शोधा ! […]
…. केजरीवालच्या पाठीराख्यांनो, सत्य कटुच असतें हो ! तरीही या खरें बोलण्यांचा राग आला असला तर माफ करा ; कारण अखेरीस, अरविंद केजरीवालचे अन् माझें alma mater एकच आहे ना ! […]
खरा प्रश्न आहे तो, सचिन व सुनील यांच्या स्टेटमेंटस् च्या योग्यायोग्यतेचा. परंतु, पत्रकार ( किंवा, भूतपूर्व पत्रकार) आशुतोष यानें विनाकरण त्याला वेगळाच रंग देऊन आक्रस्ताळेपणा केला. तसा तो आक्रस्ताळाच आहे. पत्रकार म्हणून तो एका टी.व्ही. चॅनेलशी संबंधित होता, आणि मुलाखती घेत असे, तेव्हांही त्याची पत्रकारिता आक्रस्ताळीच होती . नंतर आम आदमी पार्टीचा स्पोक्समन म्हणून तो मुलाखती देत असे, तेव्हांही तो आक्रस्ताळाच होता. त्यामुळे कालच्या चर्चेत तो एक सहभागी पाहुणा म्हणून आक्रस्ताळेपणानें बोलला तर त्याचें नवल वाटायला नको. […]
हा नाथपंथी डवरी गोसावी समाज अतिशय मवाळ आहे.. गावोगावी फिरून भिक्षुकी करून पोटाची खळगी भरणे एवढाच उद्योग त्यांना ठाऊक.. शिक्षणाच्या बाबतीतहि मागास असलेला हा समाज आधुनिकतेच्या मुख्य प्रवाहापासुन बरेच अंतर लांब आहे.. त्यामुळे या समाजाचे एकिकरन तर लांबच परंतु या समाजाचा कधिहि आपल्या मागण्यांसाठी कुठला मोर्चा अथवा समाजास हानी पोहचेल असे कार्य घडत नाहि.. […]