कशावरुन कधी काय आठवेल त्याचा नेम नाही. तसंच झालं. ‘लोकसत्ते’त एक बातमी पाहिली. महिन्द्र कंपनी ‘जावा’ मोटरसायकल ‘पुन्हा’ बाजारात आणणार, ही ती बातमी. ही बातमी वाचली आणि मन एकदम मागे गेलं. मोटरसायकल शिकण्यासाठी केलेली धडपड, माझ्या आयुष्यात आलेल्या मित्रांच्याच जावा/येझदी व इतर मोटरसायकल्स-स्कुटर्स, त्यांनी मला दिलेला आणि अजुनही मनात भरून राहिलेला अवर्णणीय आनंद इत्यादींच्या मनातल्या त्या सर्व आठवणी जिवंत झाल्या […]
काही गोष्टी काळाच्या ओघात दिसेनाशा होणार असतात हे आपण जाणून असतो पण काही करू शकत नाही. पण त्या गोष्टी दृष्टीआड झाल्या की हुरहूर लागून राहाते. मी गावाकडे कोकणात बऱ्याच वेळा जात असतो. जेव्हा जातो तेव्हा काही जुन्या गोष्टींची आठवण होते आणि मनात त्या काळाची आणि आजची तुलना सुरु होते. मग काय हरवले ह्याची एक यादीच मनात घेर धरू लागते. […]
कला, वास्तुशास्त्र, ऐतिहासिक वारसा याचा त्रिवेणी संगम असलेला हा फोर्टचा भाग म्हणजे मुंबईचं सौंदर्य. इथला अनुभव घेण्यासाठी मात्र इथे चालतच जायला हवं. “फोर्ट” हे भारदस्त नामाभिधान बाळगणार्या या भागात धोबीतलाव ते कुलाबापर्यंतचा परिसर येतो. […]
फोर्टमधल्या अनेक आयकॉनिक इमारतींच्या आत जाऊन त्या बघण्याचं भाग्य मला लाभलं. मात्र त्यावेळी आजच्यासारखं मोबाईलमधल्या कॅमेर्यांचं प्रस्थ नसल्याने दुर्दैवाने फोटो मात्र काढले गेले नाहीत. ती रुखरुख कायमची रहाणार आहे. […]
माझा जन्म नागपूर मधील १९४२ च्या प्रचंड उन्हाळयातला. मी बहुदा पाणी पाणी म्हणून पहिले रडणे सुरू केले असावे. जन्मत: दुधापेक्षा मला पाणी जास्त प्रिय आणि यामुळेच पाण्याने सतत माझा पिच्छा पुरवला आहे. […]
या मशीनवर उभं राहून त्यात नाणं टाकलं की एक चक्र फिरायचं.. ते फिरताना डिस्को लाईटस लागायचे आणि चक्र थाबलं की एक टिकिट बाहेर यायचं. या तिकिटावर तुमचं वजन छापलेलं असायचं, सोबत तुमचं भविष्यही असायचं आणि शिवाय एखाद्या फिल्मस्टारचा फोटोपण असायचा. […]
लालबाग च्या आसपासचा हा परिसर ह्या परिसरात असलेल्या कापडांच्या गिरण्यांमुळे गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होता. तीन शिफ्ट मध्ये जाणाऱ्या कामगारांचा लोंढा हा परिसर रात्रंदिवस जिवंत ठेवीत असे. गिरण्यांच्या भोंग्यावरून टाईम लावला जात असे. फूट-पाथ प्रशस्त होते आणि तरीही भरलेले असत. त्यावर फेरीवाले, भाजीवाले असायचे, कामगार वर्ग आपल्या छोट्या मीटिंगी येथेच करत. दुकानांमधून गर्दी डोकावत असे. रात्री २ ते सकाळी पाच एवढा वेळ हा परिसर त्यातल्या त्यात शांत असे. गिरण्यांचा संप झाल्यावर आणि पुढे गिरण्या बंद होऊन इथला कामगार वर्ग देशोधडीला लागल्यानंतर ह्या गिरणगावाची रया गेली ती पुन्हा आलीच नाही. […]
“लाय लाय लायेकरणी” हे असेच एक कोळीगीत. त्यात त्याकाळच्या वेगळ्या प्रदेशात राहाणाऱ्या कोळी बायकांच्या विशिष्ट वेषभूषेवरून, चाली रीती वरून, बोली भाषेवरून ती कोणत्या गावातील आहे हे ओळखता यायचे. ह्या गाण्यात त्याचेच वर्णन केले आहे. नीट ऐकाल तर त्यावेळच्या मुंबईत असणाऱ्या गावांची नावे (वेसाव, भांडुप, वरळी, दांडा, मालवणी, कुलाबा, शिवडी, शिव, वसई, कर्जत माहीम वगैरे) आपल्या कानावरून जातील. […]
कोकणाच्या प्रवासाचे हे असे टप्पे – जलमार्ग, खुष्कीचा मार्ग (रस्ते), रेल्वे मार्ग आम्ही पाहिले आणू अनुभवले. पण विमानतळ तयार होऊन येथे हवाई वाहतूक सुरु होईल असे वाटले न्हवते. अजून वाशी – नवी मुंबई येथे विमानतळ व्हायचा आहे, त्यापुढे कोकणाला विमान उड्डाणाला प्रायोरिटी असेल असे वाटले न्हवते. […]