नवीन लेखन...

जुन्या आठवणींना उजाळा देणारे लेखन

मुंबईला ‘तिची जमीन’ देणारा एक रस्ता आणि ‘ब्रीच कँडी’ची जन्मकथा

प्राचीन काळापासून मानव शहर वसवत आलाय..बरीशी जागा, आजूबाजूला पाण्याची सोय बघायची आणि वसती करायची हा पुरातन परिपाठ आहे..प्राचीन हरप्पा किंवा मोहोन्जादारो शहर असतील किंवा अगदी आता-आता पर्यंत वसलेली शहर असोत, अगदी याच पद्धतीने त्यांची निर्मिती झाली आहे..या सर्व शहरात आणि मुंबई शहरात एक जमीन अस्मानाचा फरक आहे आणि तो म्हणजे मुंबईला वसण्यासाठी तिची, स्वतःची अशी जमीनच […]

४०, के. दुभाष मार्ग – रॅम्पार्ट रो, फोर्ट, मुंबई

हा पत्ता रोज या ठिकाणाहून जा-ये करणार्‍यालाही लक्षात येणार नाही. पण ‘ र्‍हिदम हाऊस’ म्हटलं की चटकन, ‘च्यायला हा ऱ्हिदम हाऊसचा पत्ताय होय’ असे उद्गार ऐकू येतील..! […]

मुंबईची टॅक्सी आणि तिचा पिवळा टप

एक काळ होता की हिची भारीच ऐट असायची. भलेभले हिला ‘एंगेज’ करायचा जीवापाड प्रयत्न करायचे..हिच्या मागे धावत सुटायचे आणि ही मात्र त्यांना वाकुल्या दाखवत म्हणजे ‘हमको नय आना’ म्हणत आपल्याच तोऱ्यात फणकऱ्याने निघूनही जायची..असतात बाबा असतात एकेकाचे दिवस..हा हा म्हणता काळ बदलला. हीच्या तरुण, देखण्या, शिडशिडीत बांध्याच्या ‘कूल’ बहीणी रस्त्यावर अवतरल्या आणि मुंबईकर नादावले..आता वय गेलेल्या […]

मुंबईतील पुतळे – हलवलेले आणि हरवलेले – ‘लॉर्ड कॉर्नवॉलीस’

‘हलवलेल्या व हरवलेल्या पुतळ्यां’च्या तिसर्‍या भागात ‘लॉर्ड कॉर्नवॉलीस’ या भारताच्या तत्कालीन गव्हर्नर जनरलच्या पुतळ्याची माहिती आहे..हा ‘पुतळा’ त्याच्या नांवा-ठिकाणासकट लोकांच्या विस्मृतीत गेला आहे.. तरी या पुतळ्यांने जी धमाल त्या काळी उडवली होती त्यातून हिन्दू समाजाच्या मानसिकतेचं चांगलंच दर्शन होतं.. त्याची माहिती मी पुढच्या चौथ्या व शेवटच्या भागात देणार आहे. आपल्या एशियाटीक सोसायटीच्या समोर असलेलं ‘हॉर्निमन सर्कल’ […]

एस्प्लनेड मैदान, फोर्ट, मुंबई..

मुंबईच्या इतिहासासंबंधीत किंवा इतरही जुनी पुस्तकं वाचताना फोर्ट मधील ‘एस्प्लनेड मैदान’ हा शब्द बर्‍याच वेळा भेटायचा.. फोर्टमधील एस्प्लनेड मैदान म्हणजे नक्की कोणतं, हा माझा गोंधळ नेहेमी व्हायचा..पुढे मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात आलं, की ‘एस्प्लनेड मैदान’ म्हणजे कोणतंही एक मैदान नसून कुलाबा-नरिमन पॉईंटच्या फुटबॉलसाठी प्रसिद्ध असलेल्या कुपरेज मैदानापासून ते सीएसटी-मेट्रो नजीकच्या आझाद मैदान-क्रॉस मैदानापर्यंतचा पसरलेला सपाट […]

‘कॉटन ग्रीन..’

मुंबईची हार्बर रेल्वे लाईन पश्चिम व मध्य रेल्वेवर राहणाऱ्या मुंबईच्या पांढरपेशा समाजाच्या दृष्टिनं काहीशी दुर्लक्षितच..या हार्बर लाईन मुळे आपल्याला दाना-पाण्याची रसद मिळत असते याची जाणीव फार थोड्या मुंबईकरांना असते. अशा या हार्बर रेल्वे लाईनवरचं ‘कॉटन ग्रीन’ हे एक सर्वसाधारण रेल्वे स्टेशन. या स्टेशनात काही खास आहे याची जाणीव न होणारं..अशा या ‘कॉटन ग्रीन रेलवे स्टेशन’ या […]

मुंबईतील रस्त्यावरचे ३०० वर्ष वयाचे इतिहासपुरुष

मुंबईत अजुनही तग धरून असलेल्या ब्रिटीशकालीन ‘माईलस्टोन्स’ची माहिती माझ्या वाचनात आली आणि त्यांचा शोध घेण्यास मी सुरुवात केली. माईलस्टोन्सचा माग काढता काढता अचानक ‘मुंबईच्या किल्ल्या’बद्दल वाचनात आलं आणि मी थेट प्रत्यक्ष किल्ल्यावर पोहोचलो. दरम्यान माईलस्टोन्स मागे पाडले. आता मला माझ्या वाचनातून सापडलेल्या व मी पाहिलेल्या त्यापैकी काही माईलस्टोन्स बद्दल माहिती इथे देत आहे. मुंबईत असे एकूण […]

पानशेत धरण फुटीच्या आधीचे पुणे

आज बारा जुलै : पानशेत धरण फुटीच्या आधीचे अर्थात बुधवार दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ठ पूर्वीचे पुणे  ! पुणे येथील पानशेत धरण फुटलेल्या घटनेला आज पंचावन्न वर्षे पूर्ण झाली ! बुधवार दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ठ, त्यादिवशी दिव्याची आवस होती ! एवढा काळ लोटला, तरीही माझ्यासारख्या जुन्या पुणेकरांच्या मनात पानशेत धरणफुटीच्या त्या भयानक आठवणी अजुनीही विस्मुतीमध्ये […]

भारतीय नौदलाचा अभिमान – आयएनएस विक्रांत

पाकिस्तानविरुद्धच्या १९७१ च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारी मॅजेस्टिक श्रेणीची ब्रिटीश बनावटीची विमानवाहक युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ म्हणजे भारतीय नौदलाच्या अभिमानाचा विषय. आयएनएस विक्रांत (आर ११) (पूर्वीचे एच.एम.एस. हर्क्युलिस (आर ४९)) हे भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक-वर्गातील, हलके विमानवाहू जहाज होते. २२ सप्टेंबर १९४५ रोजी त्याचे जलावतरण करण्यात आले. जानेवारी १९५७ च्या सुमारास ते ब्रिटिश नौदलाकडून भारताने विकत घेतले. ४ […]

मुंबईचा संक्षिप्त राजकीय इतिहास

नुकताच काही निमित्ताने छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोर, आझाद मैदानात असलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या इमारतीत जाण्याचा योग आला. ज्येष्ठ पत्रकार श्री. कुमार कदम यांच्या सोबत इमारतीचा फेरफटका मारताना सहज म्हणून इमारतीच्या गच्चीवर गेलो. संघाच्या इमारतीच्या गच्चीवरून मुंबईच्या पूर्व बाजूची स्कायलाईन पहिली आणि ठळकपणे एक दृश्य दिसले. पत्रकार संघाच्या इमारतीच्या गच्चीवर पूर्वेकडे, मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीकडे तोंड करून […]

1 11 12 13 14 15 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..