‘हलवलेल्या व हरवलेल्या पुतळ्यां’च्या तिसर्या भागात ‘लॉर्ड कॉर्नवॉलीस’ या भारताच्या तत्कालीन गव्हर्नर जनरलच्या पुतळ्याची माहिती आहे..हा ‘पुतळा’ त्याच्या नांवा-ठिकाणासकट लोकांच्या विस्मृतीत गेला आहे.. तरी या पुतळ्यांने जी धमाल त्या काळी उडवली होती त्यातून हिन्दू समाजाच्या मानसिकतेचं चांगलंच दर्शन होतं.. त्याची माहिती मी पुढच्या चौथ्या व शेवटच्या भागात देणार आहे. आपल्या एशियाटीक सोसायटीच्या समोर असलेलं ‘हॉर्निमन सर्कल’ […]
मुंबईच्या इतिहासासंबंधीत किंवा इतरही जुनी पुस्तकं वाचताना फोर्ट मधील ‘एस्प्लनेड मैदान’ हा शब्द बर्याच वेळा भेटायचा.. फोर्टमधील एस्प्लनेड मैदान म्हणजे नक्की कोणतं, हा माझा गोंधळ नेहेमी व्हायचा..पुढे मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात आलं, की ‘एस्प्लनेड मैदान’ म्हणजे कोणतंही एक मैदान नसून कुलाबा-नरिमन पॉईंटच्या फुटबॉलसाठी प्रसिद्ध असलेल्या कुपरेज मैदानापासून ते सीएसटी-मेट्रो नजीकच्या आझाद मैदान-क्रॉस मैदानापर्यंतचा पसरलेला सपाट […]
मुंबईची हार्बर रेल्वे लाईन पश्चिम व मध्य रेल्वेवर राहणाऱ्या मुंबईच्या पांढरपेशा समाजाच्या दृष्टिनं काहीशी दुर्लक्षितच..या हार्बर लाईन मुळे आपल्याला दाना-पाण्याची रसद मिळत असते याची जाणीव फार थोड्या मुंबईकरांना असते. अशा या हार्बर रेल्वे लाईनवरचं ‘कॉटन ग्रीन’ हे एक सर्वसाधारण रेल्वे स्टेशन. या स्टेशनात काही खास आहे याची जाणीव न होणारं..अशा या ‘कॉटन ग्रीन रेलवे स्टेशन’ या […]
मुंबईत अजुनही तग धरून असलेल्या ब्रिटीशकालीन ‘माईलस्टोन्स’ची माहिती माझ्या वाचनात आली आणि त्यांचा शोध घेण्यास मी सुरुवात केली. माईलस्टोन्सचा माग काढता काढता अचानक ‘मुंबईच्या किल्ल्या’बद्दल वाचनात आलं आणि मी थेट प्रत्यक्ष किल्ल्यावर पोहोचलो. दरम्यान माईलस्टोन्स मागे पाडले. आता मला माझ्या वाचनातून सापडलेल्या व मी पाहिलेल्या त्यापैकी काही माईलस्टोन्स बद्दल माहिती इथे देत आहे. मुंबईत असे एकूण […]
आज बारा जुलै : पानशेत धरण फुटीच्या आधीचे अर्थात बुधवार दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ठ पूर्वीचे पुणे ! पुणे येथील पानशेत धरण फुटलेल्या घटनेला आज पंचावन्न वर्षे पूर्ण झाली ! बुधवार दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ठ, त्यादिवशी दिव्याची आवस होती ! एवढा काळ लोटला, तरीही माझ्यासारख्या जुन्या पुणेकरांच्या मनात पानशेत धरणफुटीच्या त्या भयानक आठवणी अजुनीही विस्मुतीमध्ये […]
पाकिस्तानविरुद्धच्या १९७१ च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारी मॅजेस्टिक श्रेणीची ब्रिटीश बनावटीची विमानवाहक युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ म्हणजे भारतीय नौदलाच्या अभिमानाचा विषय. आयएनएस विक्रांत (आर ११) (पूर्वीचे एच.एम.एस. हर्क्युलिस (आर ४९)) हे भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक-वर्गातील, हलके विमानवाहू जहाज होते. २२ सप्टेंबर १९४५ रोजी त्याचे जलावतरण करण्यात आले. जानेवारी १९५७ च्या सुमारास ते ब्रिटिश नौदलाकडून भारताने विकत घेतले. ४ […]
नुकताच काही निमित्ताने छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोर, आझाद मैदानात असलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या इमारतीत जाण्याचा योग आला. ज्येष्ठ पत्रकार श्री. कुमार कदम यांच्या सोबत इमारतीचा फेरफटका मारताना सहज म्हणून इमारतीच्या गच्चीवर गेलो. संघाच्या इमारतीच्या गच्चीवरून मुंबईच्या पूर्व बाजूची स्कायलाईन पहिली आणि ठळकपणे एक दृश्य दिसले. पत्रकार संघाच्या इमारतीच्या गच्चीवर पूर्वेकडे, मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीकडे तोंड करून […]
काळा घोड्यानंतर मुळ जागेवरून हलवलेल्या ‘क्विन व्हिक्टोरीया’च्या अपरिमित देखण्या पुतळ्याची माहिती देण्याचा मोह मला आवरत नाही.. ‘काळा घोडा’ चौकातून आपण एम.जी. रोडने (महात्मा गांधी रोड) सीएसटी स्टेशनच्या दिशेने निघालो, की पाच मिनिटात फ्लोरा फाऊंटन किंवा हुतात्मा चौकात पोहोचतो..हुतात्मा चौकात चर्चगेटच्या स्टेशनच्या दिशेने समोरच ‘सीटीओ’ची म्हणजे आपल्या ‘तार ऑफीस’ची इमारत आहे (१८७२ साली मुंबईचं जीपीओ प्रथम या […]
भारतीय हिंदी चित्रपटाचा वरील काळ सुवर्ण युग म्हणून ओळखला जातो. त्या काळातील नर्गीस, मधुबाला, मीनाकुमारी, बहिदा रेहमान, नुतन, वैजयंतीमाला, साधना या अभिनेत्रींनी सर्वाथाने गाजवला. या तारका रसिक मनाच्या कोंदणात अजूनही विराजमान असून त्यांच्या सौदर्याचा अभिनयाचा नृत्यांमधील पदन्यास, पदलालित्याचा मोहमयी प्रवास अभिनयातील वैविध्यता जाणून घेणे रंजक आहे […]
१६ एप्रिल १८५३ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई ते ठाणे अशी देशातली पहिली ट्रेन धावली. तीन इंजीनं आणि वीस डब्यांच्या या गाडीनं हे अंतर ५८ मिनिटांत पूर्ण केलं..हे त्या काळचं एक मोठ्ठ आश्चर्य होतं.. आज १२-१५ डब्यांच्या गाड्या आश्चर्य राहीलं नसल तरी एके काळी ‘सहा डब्यां’च्या गाडीचं कौतुक होंतं.. तीच याद ताजी करण्यासाठी हा फोटो..!!