काळा घोड्यानंतर मुळ जागेवरून हलवलेल्या ‘क्विन व्हिक्टोरीया’च्या अपरिमित देखण्या पुतळ्याची माहिती देण्याचा मोह मला आवरत नाही.. ‘काळा घोडा’ चौकातून आपण एम.जी. रोडने (महात्मा गांधी रोड) सीएसटी स्टेशनच्या दिशेने निघालो, की पाच मिनिटात फ्लोरा फाऊंटन किंवा हुतात्मा चौकात पोहोचतो..हुतात्मा चौकात चर्चगेटच्या स्टेशनच्या दिशेने समोरच ‘सीटीओ’ची म्हणजे आपल्या ‘तार ऑफीस’ची इमारत आहे (१८७२ साली मुंबईचं जीपीओ प्रथम या […]
भारतीय हिंदी चित्रपटाचा वरील काळ सुवर्ण युग म्हणून ओळखला जातो. त्या काळातील नर्गीस, मधुबाला, मीनाकुमारी, बहिदा रेहमान, नुतन, वैजयंतीमाला, साधना या अभिनेत्रींनी सर्वाथाने गाजवला. या तारका रसिक मनाच्या कोंदणात अजूनही विराजमान असून त्यांच्या सौदर्याचा अभिनयाचा नृत्यांमधील पदन्यास, पदलालित्याचा मोहमयी प्रवास अभिनयातील वैविध्यता जाणून घेणे रंजक आहे […]
१६ एप्रिल १८५३ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई ते ठाणे अशी देशातली पहिली ट्रेन धावली. तीन इंजीनं आणि वीस डब्यांच्या या गाडीनं हे अंतर ५८ मिनिटांत पूर्ण केलं..हे त्या काळचं एक मोठ्ठ आश्चर्य होतं.. आज १२-१५ डब्यांच्या गाड्या आश्चर्य राहीलं नसल तरी एके काळी ‘सहा डब्यां’च्या गाडीचं कौतुक होंतं.. तीच याद ताजी करण्यासाठी हा फोटो..!!
दक्षिण मुंबईतल्या ब्रिटीशकालीन, परंतू आता विस्थापित, पुतळ्यांत ‘काळा घोडा’ पुतळ्याचा अव्वल नंबर लागेल. अव्वल याचसाठी की पूर्वी इथं असलेल्या या पुतळ्याविषयी बऱ्याच मुंबैकरांना ऐकून का होईना पण माहिती आहे. सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीच्या दारात असलेल्या चौक व परिसराला ‘काळा घोडा’ म्हणतात..हा परिसर मुंबईचा ‘आर्ट अॅण्ड कल्चर डिस्ट्रीक्ट’ म्हणून ओळखला जातो. जहांगीर आर्ट गॅलरी आणि त्यातील ‘समोवार’ […]
या कथेच्या पहिल्या भागात बघितलेला ‘काळा किल्ला’ जरी भौगोलिक दृष्टीने धारावीत असला तरी ‘धारावी किल्ला’ या नावाचा किल्ला हा चक्क ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे असल्याचा उल्लेख सापडतो. या ठिकाणी ‘धारावी देवी’ असल्याचाही उल्लेख आहे. आता भाईंदरच्या या किल्ल्याचे नाव देवीवरून पडले की देवीवरून किल्ल्याचे नाव पाडले हे समजणे कठीण आहे. ‘काळा किल्ल्या’चे कागदोपत्री नाव ‘रीवाचा किल्ला’ […]
सत्तरच्या दशकात ठाणे शहरातली पॉईंट-टू-पॉईंट वाहतूक टांग्यानेच होत असे. रिक्षा फारच नंतर आल्या. टांगे एक घोड्याने ओढण्याचे असायचे तसेच दोन घोड्यांनी ओढायचे देखील असायचे. टॉक-टॉक..टॉक-टॉक.. असा लयदार आवाज काढत हे टांगे गावातून फिरायचे. वाहतूकीची कितीही आधुनिक साधने आली तरी ठाण्याच्या टांग्याचा तो प्रवास कायमचा आठवणीत राहील. […]
मला कोणी विचारले की तुझे मुळ गाव कोणते तर सहजपणे माझ्या तोंडातून ठाण्याचेच नाव येते. खरंतर प्रधान कुटुंबीय मूळचे कोकणातले. मात्र आता कोकणात काहीही राहिले नाही. वाडवडिलांनी काही पिढ्यांपूर्वीच कोकण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी आपले बस्तान बसवले. त्याचप्रमाणे माझ्याही कुटुंवाचे कोकणातून ठाण्याला स्थलांतर झाले मात्र तेही व्हाया गुजरात. माझा जन्म मुंबईतला. अगदी दादरच्या शिवाजी पार्कचा, कारण आजोळ […]
भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र दिल्लीत १९५८ साली सुरू झाले. त्यानंतर २ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबईत दूरदर्शन केंद्र सुरू झाले. नंतरच्या काळात आशियाई क्रिडा स्पर्धांच्या वेळी भारतात रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. तेव्हा अगदी मोजकीच चॅनेल असायची आणि कार्यक्रमसुद्धा अत्यंत दर्जेदार असायचे. या दर्जेदार कार्यक्रमातलाच एक कार्यक्रम म्हणजे शेतकरी बंधूंसाठी असलेला ‘आमची माती- आमची माणसं’ ! खरंतर पहिले […]
धारावी. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी..या आक्राळ विक्राळ पसरलेल्या झोपडपट्टीच्या एका कोपऱ्यात मुंबईच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असणारा एक ऐतिहासीक किल्ला आपलं अस्तित्व टिकवायला धडपडतोय. या किल्ल्याची बहुसंख्य ‘मुंबई आमची, नाही कोनाच्या बापाची’ म्हणणाऱ्यांना खबरही नसेल हे निश्चित..! इसवी सन १७३७ मध्ये उभारलेल्या या किल्ल्याचं नांव ‘फोर्ट रिवा किंवा रेवा’ असं असलं तरी पूर्वीपासून हा किल्ला ‘काळा किल्ला’ […]