सोळाव्या शतकाच्या प्रारंभी मुंबईच्या इतिहासाच्या रंगमंचावर पोर्तुगीजांचा प्रवेश झाला आणि मुंबई खऱ्या अर्थाने जागतिक नकाशावर उगम पावायला सुरूवात झाली. शेवटचा गुजराथी सुलतान बहादूरशहा याने उत्तरेकडून मोगलांचे दडपण व दक्षिणेत वाढणारे पोर्तुगीजांचे आक्रमक सामर्थ्य या पेचातून अंशत: मोकळे होण्यासाठी सोळाव्या शतकाच्या मध्यावर मुंबई आणि वसई ही दोन समुद्राकाठची ठिकाणे पोर्तुगीजांच्या हवाली केली. सन १५३४ साली मुंबई पोर्तुगीजांच्या […]
आपला, आपल्या शहराचा व देशाचाही इतिहास आपल्याला माहित हवा..जे आपला भूतकाळ विसरतात त्यांना भविष्य क्षमा करत नाही हे अनेक विचारवंतांनी सांगून ठेवलंय.. मी मुंबईत जन्मलो, वाढलो व त्यामुळे मला सहाजीकच मुंबईच्या इतिहासात रस आहे आणि तो निर्माण करण्याचं काम केलं मुंबईच्या फोर्ट परिसराने.. मुंबईचा फोर्ट परिसर आपल्यावर गारूड करतोच..मग त्या इतिहासाचा मागोवा घेत गेलं की अनेक […]
मुंबईच्या दक्षिण टोकावर असलेला ‘फोर्ट’ एरिया ज्याने पाहिला नाही त्यानं मुंबई पाहिली नाही असं म्हणायला हरकत नाही..किंबहूना, मुंबई हे संबोधन मुख्यत्वेकरून याच विभागाला लागू होतं असं म्हटलं तरी चुकणार नाही..फोर्टातले ते प्रशस्त रस्ते आणि फुटपाथ, त्या ब्रिटीशकालीन भव्य आणि देखण्या इमारती, प्रत्येक इमारतीला असलेला घाटदार घुमट वा उंचं मनोरा याची भुरळ न पडणारा विरळाच..! हा सारा […]
ब्रिटिशकालीन मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे लोकप्रिय साधन म्हणून ट्राम ओळखली जायची. ससून डॉकपासून थेट किंग्ज सर्कलपर्यंत या ट्रामचे जाळे पसरले होते. ऑपेरा हाऊस, चर्नीरोड, गोल देऊळ, सीपी टँक, ताडदेव, बोरिबंदर (आत्ताचे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस), जे. जे. रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आदी अनेक भागांमध्ये या ट्रामने प्रवास करता येत असे. BEST कडून ही सेवा चालवली […]
लोकराज्यचे 1956 पासूनचे अंक मी ग्रंथालयात अनेकवेळा चाळले होते. मात्र त्यापेक्षाही जुने प्रारंभीचे अंक मिळणार म्हणून मी जरा जास्तच आनंदात होतो. मनात विचारांची गर्दी जमली होती. लोकराज्यची मोठी परंपरा नजरेसमोर येत होती. लोकराज्य हे केवळ नियतकालिक नाही तर तो आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार आहे. गेल्या सहा दशकात लोकराज्यने खूप काही अनुभवले आहे. […]
महाराष्ट्रात कोकण जसा खाद्यपदार्थांसाठी जितका प्रसिद्ध आहे तितकाच लाकडी खेळणी निर्मितीसाठीही आहे. कोकणातील सावंतवाडी आणि रायगड जिल्ह्यातील पेण येथे ही लाकडी खेळणी तयार केली जातात. सावंतवाडी या शहरात लाकडी वस्तू खूप चांगल्या आणि वाजवी दरात मिळतात. पालकांनी लाकडी खेळण्यांना प्राधान्य दिल्यास देशात मुख्यत्वे महाराष्ट्रात तरी नवीन झाडे लावली जातील आणि पर्यावरणाचा तोल सांभाळा जाईल अशी आशा आहे. […]
राज्याच्या व देशाच्या कानाकोपर्यात लग्न समारंभासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांत गेल्या दोन शतकांहूनही अधिक काळ पारंपारीक पत्रावळ अधिराज्य करत होती. पळसाच्या पानांपासून बनवलेली ही पत्रावळ म्हणजे गरिबांच्याच काय पण मध्यमवर्गीयांच्या लग्न-मुंज-पूजा समारंभातला एक अविभाज्य भाग होती. जीवनमानातील बदलांमुळे शहरात पत्रावळींची जागा स्टीलच्या ताट-वाट्यांनी घेतली. त्यानंतरच्या काळात पंगत संस्कृती लोप पावत चालली आणि त्याची जागा बुफे लंच-डिनरने घेतली. या बुफे पद्धतीत मोठ्या ताटांची जागा छोट्या बुफे प्लेटसनी घेतली. शहरांमधल्या जेवणावळींतून `आग्रह’ हा प्रकार हद्दपार झाला. आता तर आमंत्रणातच `स्वेच्छाभोजनाची […]
पुण्यातल्या प्रत्येकच रस्त्याला त्याची स्वतंत्र राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशी ओळख आहे. त्यातलाच एक रस्ता म्हणजे टिळक रस्ता. टिळक चौक आणि स्वारगेट यांना जोडणाऱ्या या रस्त्यावर न्यू इंग्लिश स्कूल, साहित्य परिषद, टिळक स्मारक, अभिनव कला महाविद्यालय, हिराबाग चौक, या वास्तूंच्या बरोबरीने एक वास्तू दिमाखदारपणे उभी असलेली दिसते ती म्हणजे सर परशुरामभाऊ महाविद्यालय. बाहेरून जाणारे काहीजण कुतूहलाने, काही जण नॉल्टेजिक होऊन आणि काही जण इथे येण्याच्या स्वप्नाळू नजरेने त्या दगडी इमारतीकडे बघतात. […]
मुंबईवरील इंग्रजी सत्तेची पहिली चाळीस वर्षे लोटल्यावर साधारपणे १७१० नंतर – रोग, परकीय आक्रमणे इ. संकटांचे भय बरेचसे ओसरले होते. बळ आणि आत्मविश्वास हे गुण वाढले तेव्हां काहीशा निर्भयपणाने इंग्रज प्रगतीचा मार्ग आक्रमू लागले. जमिनीवर होणाऱ्या समुद्राच्या लढाईला लगाम घालून ती थोपविण्याचे जमल्यावर शहरे वाढू लागली. नवीन रस्ते तयार केले गेले आणि पालखी हे वाहन पुष्कळच […]