दसरा झाला की वेध लागायचे ते दिवाळीचे.घराची साफसफाई तर दसर्यालाच झालेली आसायची,घर कसल ते दहाबाय दहाची खोलीच ती,वर एक पोटमाळा त्यातच आईने जुन्या कपडयांच बोचक,ताईच्या लग्नात आलेली आहेराची भांडी,वापरात न आलेल सामान अस बरचस काहीबाही सामान कस नीट लावून ठेवलेल आसायच. […]
काल पु.ल. वाचत बसलो होतो. ते एके ठिकाणी म्हणतात “तुम्हाला ‘मुंबईकर’ व्हायचं असेल तर तुम्हाला मुंबईत जन्माला येणं अत्यंत आवश्यक आहे, कारण तुमच्या रहाण्याच्या जागेचा प्रश्न हा तुमच्या जन्मदात्यानीच सोडवायला हवा.” मी हे वाक्य वाचता वाचता विचारात पडलो… ‘अरे, हे तर अगदी माझ्या मनातले शब्द पुलं नी लिहिलेत’. कारण माझा ही जन्म मुबंईचाच की. […]
गावात रामदास नावाचे कासार होते ..ते गल्लोगल्ली बांगडी, बिल्लोर म्हणून आवाज द्यायचे …मग त्यांना आवाज दिला की ते घरी येऊन….बांगड्या हातात भरून देत असत.. विविध रंगी बांगड्या काय मन मोहून घ्यायच्या म्हणून सांगू…..रामदास दादांचा स्वभाव खूप मिश्किल होता.सदोदित चेहऱ्यावर हास्य. […]
अनेक वयस्कर लोकांच्या लहानपणच्या आठवणीत टांगा नक्कीच असणार. आॅटो रिक्षा सुरु होण्याआधी गावातल्या गावात, बाहेरगावाहून ट्रेनने प्रवास करून आल्यावर स्टेशनपासून, बसस्टँडपासून घरी जाण्याचा तोच एक मार्ग ,पर्याय होता. आणि लहानपणी तर टांग्यात बसणे म्हणजे एक मोठा आनंदाचा क्षण असे. त्यात चढणं तितकं सोपं नसायचं..थोडं जिकिरीचंच असायचं , अगदी लहान असताना बाबा, काका उचलूनच ठेवायचे…पुढे स्वतः चढणं सुरु केलं ..केवढा आनंद असायचा तो. […]
भारतातल्या सर्वसामान्य नागरिकाला डोळ्यांसमोर ठेवून, तळागाळातल्या समाजाचा विचार करून स्त्रीसक्षमीकरणाला प्राधान्य देऊन आकाशवाणीचे कार्यक्रम केले जातात. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम आणि चित्रपट संगीत हा तर आकाशवाणीचा आत्मा आहे. अनेक दिग्गज कलाकारांची ध्वनीमुद्रणे, अभिजात रंगमंचीय नाटकांचे नभोनाट्य रूपांतर आकाशवाणीच्या संग्रहात आहेत. जेव्हा जेव्हा आकाशवाणीच्या संग्रहातल्या या कार्यक्रमांचे प्रसारण होतं तेव्हा ती खरं तर श्रोत्यांच्यासाठी मेजवानी असते. […]
डिक्शनरी आणि डिरेक्टरी आता नामशेष होण्यातच जमा आहेत. आजची e -पिढी गुगल वरच त्यांचे अर्थ सर्च करेल. पण आमचे हे संपर्क आणि शब्दांचे ब्राउझर आठवणींच्या ट्रंकेतला एक कोपरा व्यापुन विराजमान राहतील. […]
प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील प्रवासात काही गोष्टीचे महत्व असते. त्यामध्ये काही जणांना लोकलचे, तर काहींना बसचे. तर काहींना रिक्षाचे, मला मात्र रेल्वे ट्रॅकचे लहानपणी आमच्या गावातील रेल्वे ट्रॅक आमच्या जीवनाचा भाग होता. आमची वसाहत या ट्रॅक मुळे दोन भागात विभागलेली होती. […]