मी आणि हदेप्र – हरिभाई देवकरण प्रशाला !
भुसावळमध्ये असताना प्राथमिक शाळेला “बालवाडी वा शाळा” आणि माध्यमिक शाळेला “हायस्कूल ” म्हणणारा मी ऑगस्ट ७४ ला सोलापूर नामक महानगरात पाऊल टाकल्यावर “प्रशाला “या नव्या शब्दाला भेटलो. […]
जुन्या आठवणींना उजाळा देणारे लेखन
भुसावळमध्ये असताना प्राथमिक शाळेला “बालवाडी वा शाळा” आणि माध्यमिक शाळेला “हायस्कूल ” म्हणणारा मी ऑगस्ट ७४ ला सोलापूर नामक महानगरात पाऊल टाकल्यावर “प्रशाला “या नव्या शब्दाला भेटलो. […]
१८५३ साली मुंबईत सुरू झालेल्या भारतातल्या पहिल्या रेल्वेने १६ एप्रिल २००३ रोजी दिडशेव्या वर्षात पदार्पण केले त्यानिमित्त रेल्वे मंत्रालयाने मुंबईत एक महत्त्वाचा सोहळा आयोजित केला होता. रेल्वेला तिच्या गुणदोषांसह स्वीकारून आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनवलेल्या मुंबईकरांनी त्या दिवशी मध्य रेल्वेची ठाण्यापर्यंतची सगळी स्टेशन्स व्यापून टाकली आणि रेल्वेवरील आपलं निस्सिम प्रेम व्यक्त केलं होतं. १६ एप्रिल १८५३ […]
परवा सहजच संध्याकाळच्या वेळी गावाहून येता येता गोदावरी काठी थोडा वेळ थांबलो.ताडकळस आणि पालम या दरम्यान धानोरा (काळे) या ठिकाणी गोदावरी नदीवर मोठा पूल बांधण्यात आला आहे. तिथे थोडा वेळ काम नसतांना ही रेंगाळलो पुलावरून खाली पाहिले असं काही मनोहर दृश्य दिसलं की मला पूर्वीच्या काळच्या दिपमाला ची आठवण झाली संध्याकाळ म्हणजे दिवे लागणीची वेळ, त्यातल्या त्यात त्यात दूरवरून झगमगणारे हे दिवे पाहिले जी माणसाला अधिकच आनंद होतो. […]
ही गोष्ट आज सांगतांना मात्र अतिशय आनंद होतो अभिमान वाटतो की एवढया दुर्गम भागात आपण सुरूवातीचे दिवस काढले पुढे मग शाळेवर गेल्यावर याचे काहीच वाटले नाही. अतिशय आनंदाने शाळेत जात असे मी उलट घरी आल्यावरच करमत नसे अशी माझी पहिली नोकरीतील शाळा. आज ही माझ्या तेवढीच चांगल्या रितीने स्मरणात राहिली आहे. […]
मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ पंडित बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित केले. ठाण्यात मात्र पहिले वृत्तपत्र २२ जुलै १८६६ रोजी निघाले. त्या वृत्तपत्राचे नाव होते ‘अरुणोदय.’ हे वृत्तपत्र काशिनाथ विष्णू फडके यांनी काढले. त्यांनी जांभळीनाक्यावरील पोलिस चौकीजवळ आपला छापखाना टाकला. फडके यांचे हे वर्तमानपत्र ठाणे जिल्ह्यातील पहिले साप्ताहिक होय. […]
गावाकडच्या खेळाची रंगत भारीच असायची.दुपारच्या वेळी सर्वत्र सूर्य आग ओकत असतांना आम्ही पोरंसोरं मात्र खेळात दंग असायचो.बारवंवरच्या मळयात मोठया केळया आंब्यावर आमचेच राज्य चालायचे..राम्या.मारत्या, देईद्या,सरावण्या, सख्या,डिग्या,दास्या किती नावं घ्यावीत.डाफ नावाचा खेळ एवढा रंगायचा की तहान भूक विसरून जायची.आज हे खेळ नामशेष होत आहेत. […]
आज सर्वत्र कृत्रिम धागे आणि दो-या यांचाच काळ आहे. सर्व कामासाठी नायलॉनच्या दो-यांचा वापर होत आहे,पण एक काळ होता जेंव्हा शेतातील कामासाठी नैसर्गिक धाग्यापासून बनलेल्या दोरीचा वापर व्हायचा.अंबाड्याच्या बट्ट्यापासून दोर वळायचे….गावोगावी वट्यावर म्हातारी माणसे दो-या वळत बसलेले दिसायचे. […]
घराच्या अंगणात चार डिळ्या (खांब)रोवले जायचे त्याच्यावर उभे आडवे लाकडं बांधून त्यावर पळसाच्या पानांचं दाट आवरण असायचं.. या मांडवाखाली एवढं गार वाटायचं की आमचं सगळं कुटुंब पावसाळ्याची चाहूल लागेपर्यंत तिथेच असायचं.या मांडवावर टाकण्यासाठी पळसाची पानं असायची त्याला आमच्याकडे एक विशिष्ट शब्द होता,त्याला ‘व्हरका’ असं म्हणायचे… […]
चित्रपटांतील नायिकांना “नृत्य “आलेच पाहिजे हा एक अलिखित नियम आहे. नायकांना जमले नाही (गेला बाजार – सनी देओल) तरी चालते, पण नायिकांची त्यापासून सुटका नाही. आजवर चित्रसृष्टीने अतिशय संस्मरणीय बहारदार नृत्याचे प्रसंग दिलेले आहेत आणि काही अत्युत्तम नर्तिकाही बहाल केलेल्या आहेत. मला व्यक्तिशः आवडलेले तीन प्रसंग आणि त्या साकारणाऱ्या तिघीजणी ! […]
स्नेहमेळावा म्हणजे नॉस्टॅल्जिया – गेलेले दिवस/एकत्र घालविलेले क्षण जे कधीच परतून येणार नाहीत, त्यांच्या गल्लीबोळात हिंडून येणे, दैनंदिनीत तेवढाच बदल- टॉनिक सारखा किंवा जीवनसत्वासारखा ! दरवेळच्या “वजाबाकीची ” गुपचूप नोंद घेणे आणि शक्य आहे तोपर्यंत भेटत राहणे – बाकी काही नाही. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions