नवीन लेखन...

जुन्या आठवणींना उजाळा देणारे लेखन

तेव्हा (१९७२) ते आज (२०२१)

पन्नास वर्षे कालनदीतून वाहून गेली आणि ती सगळी चिमुरडी(?) मुले, आता साठी उलटलेली आजोबा मंडळी झाल्यावर पहिल्यांदाच औपचारिकरीत्या दोन दिवसांसाठी भेटली. […]

‘सुन्या सुन्या’ – उध्वस्त स्मिताचा अल्बम !

कितीतरी पारितोषिके मिळालेली स्मिता मला भावून गेली. अतिशय बोलक्या डोळ्याची, मनस्वी कलावंत ! ” उंबरठा ” हा सर्वार्थाने तिचा चित्रपट होता. आणि हे गाणेही केवळ तिचेच होते. जब्बारला तिच्यापेक्षा समर्थ पर्याय त्यावेळी तरी मिळाला नसता. […]

पुराव्याने शाबित

भांड्यांवर नाव टाकण्यामागे कारण असं असायचं की, कधी शेजारी पाजारी ते भांडं काही वस्तू घालून दिलं, तर ते सहज परत मिळावं व त्याची त्यांच्या भांड्यात सरमिसळ होऊ नये म्हणून…त्यावर नाव असल्याने आपण ते भांडे आपलेच आहे, हे ‘पुराव्याने शाबित’ करु शकतो.. […]

कस्टम शाॅपी

त्याकाळी वर्तमानपत्रात कस्टमने जप्त केलेल्या वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांच्या जाहिराती असत. काही जाहिराती ‘छोट्या जाहिराती’ सदरात येत असत. पहिल्या पानावर जाहिरात असायची ती ‘घरोंदा’ कस्टम शाॅपीची! त्या जाहिरातीत परदेशी घड्याळे, पर्फ्युम, कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे, टेप रेकाॅर्डर, व्हिसीआर, खेळणी यांची यादी व किंमती दिलेल्या असत. […]

टेलिफोन

आमच्या टेलिफोनमुळे काही विनोदी घटनाही अनुभवास येत होत्या. जेंव्हा सुरवातीला आमच्याकडे टेलिफोन आला तेव्हा आमच्या एका शेजाऱ्याने त्याच्या बायकोला आमच्या फोनवर फोन केला. मी त्याच्या बायकोला जाऊन बोलावून आणलं. यापूर्वी फोनवर कधीही न बोललेली बाई टेलिफोनचा रिसिव्हर हातात धरतात थरथर कापू लागली जणू तिला मलेरियाचा ताप भरलेला असावा. आमच्याच शेजारची दुसरी एक स्त्री टेलिफोनचा रिसिव्हर कानापासून तीन चार इंच लांब धरायची. […]

कुंकू… काल आणि आज

भारतीय स्त्रीला सौभाग्याच्या या लेण्याची पूर्वापार परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून स्त्री कपाळावर लाल रंगाचा कुंकवाचा टिळा लावत आलेली आहे. खेडेगावात कुंकू लावण्याच्या पद्धतीवरुन त्या स्त्रीच्या नवऱ्याचा व्यवसाय कळत असे. राजा रवीवर्माच्या अनेक देवी, अप्सरा, ऋषिकन्यांच्या चित्रांतून आपण त्यांच्या कपाळावर लाल रंगाची खूण पाहिलेली आहे. […]

पावसाचे संदर्भ…

रिमझिम पाऊस चालू असताना झाडांनी आपले कांद्याचे हात पसरून घ्यायला सुरुवात केलेली.. जिकडे तिकडे ओली ओली माती मधूनच वा-याची गार लहर.. अगदी अंगावर शहारे आणणारी… आसपासच्या नदी नाल्यात खळखळ सुरू झालेली.. भिजलेल्या पाखरांचे फांदी आड दडणे.. वाऱ्याच्या लहरीने झाडांचे शहारणे.. या गोष्टी जितक्या सूक्ष्म निरीक्षणातून येतात तितक्याच त्या सुंदर वाटतात.. […]

चिचा

आमच्या आगरी भाषेत चिंचेला चिच बोलतात. ड ऐवजी र आणि ळ ऐवजी ल तसेच चिंच ऐवजी चिच. चिंचेच्या झाडावर चढला असे कोणाला सांगायचे असेल तर ” तो बघ चिचेच्या झाराव चरला ” असे बोलले जाते. […]

आनंदें भीमदर्शनें !

पुण्यात मारुतीची मंदिरं शंभराहून अधिकच असतील. त्यातील काही तर पेशवेकालीनही आहेत. पुणे तसं गणपतीच्या व मारुतीच्या असंख्य मंदिरामुळे बुद्धिमान व बलशाली आहे. पेठापेठांतून तालमी दिसतात, तालीम आली की, पहेलवानांचं दैवत मारुती मंदिर हे ओघानं येतच. थोडक्यात आढावा घ्यायचाच झाला तर पहा… जिलब्या मारुती, पत्र्या मारुती, पावन मारुती, पोटसुळ्या मारुती, पंचमुखी मारुती, पिंपळेश्वर मारुती, सोन्या मारुती, उंटाडे मारुती, शकुनी मारुती, भिकारदास मारुती, दास मारुती, जुळ्या मारुती, दक्षिणमुखी मारुती, इत्यादी. अनेक ठिकाणी शनी-मारुती मंदिरंही आहेत. […]

करवंदे अलिबागची

शाळेला सुट्टी लागल्यावर ओढ लागायची ती मांडव्याची. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मामाच्या गावांत एप्रिल मे महिन्यातील दीड महिन्याची सुट्टी भर्रकन संपून जायची. भाऊच्या धक्क्यावरून लाँच पकडून रेवस मार्गे मांडव्यापर्यंतच्या प्रवासाने सुट्टीला सुरवात व्हायची. […]

1 4 5 6 7 8 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..