MENU
नवीन लेखन...

जुन्या आठवणींना उजाळा देणारे लेखन

मुंबईतल्या रेल्वे स्टेशनांवरचे ब्रिटिशकालीन रॅम्प्स

मध्य रेल्वेवरच्या चिंचपोकळी आणि करी रोड या स्टेशन्सशी माझा लहानपणापासूनचा संबंध. त्याचं कारण माझं आजोळ लालबागचं. माझं राहाणं पश्चिम रेल्वेवरच्या प्रथम अंधेरी आणि नंतर दहिसरचं. लहानपणी अंधेरीला राहात असताना, आईच बोट धरून मामाकडे जाण्याचा आवडता मार्ग म्हणजे, ‘४ लिमिटेड’ बस. वरच्या डेकवर सर्वात पहिल्या सीटवर जाऊन बसलं, की स्वर्ग हातात आल्याचा आनंद व्हायचा. अंधेरी पश्चिमेतल्या ‘कॅफे अल्फा’च्या समोरच्या पहिल्या स्टोपवर बस आली, की आपली आवडती सीट पकडायची आणि टकमक पाहत लालबाग मार्केटच्या स्टॅपवर उतरायचं, ह्यात बडा आनंद होता. […]

मे महिन्याची सुट्टी

पोरांना मे महिन्याची उन्हाळी सुट्टी पडली की घरातल्या बायकांना जरा निवांतपणा मिळतो मग याच उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग या बायका इतर वार्षिक घरगुती पदार्थाच्या साठवणीने करतात. जसं कि, चिनीमातीच्या बरण्यांमध्ये लोणचं बनवून वर्षभरासाठी मुरवत ठेवणे, लाल मिरची, शंकासुरी मिरचीचे लाल मसाले (कांडायला) दळायला देणे, नानकटाया बनवून बेकरीत भाजायला देणे, आमपोळ्या, फणसपोळ्या, मुरांबा बनवणे, फणसाचे काप तळणे वगैरे. […]

टीव्हीच्या आठवणी…

चॅनेल्स नव्हती,रिमोट नव्हते त्यामुळे जे काही समोर सुरू आहे, ते भक्तिभावाने पाहत सगळं कुटुंब रंगून जायचं…त्यातल्या त्यात टीव्हीचा आवाज कमीजास्त करणं हीच काय ती हालचाल.. तेव्हाचा रिमोट हा घरातील शेंडेफळ असे.. […]

कलकत्ता मेल व्हाया नागपूर – भाग ३

नियतीने हा वन डाऊन चा मार्ग माझ्यासाठी पुढे अनेकदा निवडून ठेवला होता आणि थेट सिक्कीम, भूतान , आसाम पर्यंत या गाडीच्या मदतीने माझे पाय लागले. आता वन डाऊन च्या तोडीची गीतांजली व दुरांतो एक्सप्रेस या गाड्या दिमतीला आहेत. परंतु आजही वन डाऊन नागपुर मेल तशीच रुबाबात आपला प्रवास करीत आहे. […]

आंबेटाकळीची आमराई

माझे मूळ गाव खामगाव तालुक्यामधील आंबेटाकळी आहे. प्राथमिक शिक्षण गावातच झालेले असून गावाचे वैशिष्ट्ये म्हणजे, नावाप्रमाणे आंबेटाकळी शिवारात आमराई होत्या. त्या लोप पावल्या असल्या तरी आठवणी मात्र कायम आहेत. याविषयी… […]

कलकत्ता मेल व्हाया नागपूर – भाग २

दत्तूकाका व माझे वडिल अनेक वर्षे खडकपूरला सुट्टीमध्ये जातच राहिले. मोठी रेल्वे कॉलनी. रोज निरनिराळ्या गाड्यांच्या गप्पा त्यातही वन डाऊन विशेष चर्चेत असे. गाड्यांचे टाईमटेबल व त्या लेट का होतात यावर तासन्तास काथ्याकूट. या सर्व मार्‍याचा दत्तूकाकांच्या मनावर असा काही जबरदस्त पगडा बसला की त्यांनी चक्क इंजिनमधील फायरमनची नोकरी पकडली. […]

माझे गाव हरवले आहे !

आता मात्र दिवस पार बदललेत. रस्त्यावर फक्त अनोळखी गर्दी, गर्दी आणि गर्दी. ओळखीचे चेहरे शोधावे लागतात. अठरा पगड जातीतील आणि वेगवेगळ्या प्रांतातून आलेली माणसे ओसंडून वाहत आहेत. प्रत्येकाचे वागणे वेगळे. मराठीपण कधीच संपून गेले. […]

कलकत्ता मेल व्हाया नागपूर – भाग १

मुंबईहून नागपूर मार्गे कलकत्त्याला जाणारी ही एक महत्त्वाची व तितकीच मानाची गाडी. त्यामुळे तिला नंबर सुध्दा होता वन डाऊन टु अप. काळाप्रमाणे आता हे नंबर बदललेले आहेत.  […]

आठवडी बाजार

रत्नागिरी जिल्ह्यातलं राजापूर तालुक्यातलं ताम्हाणे हे आमचं बारा वाड्यांचा छोटस गाव. आमच्या गावाला रोज लवकरच जाग येते तरीही दर बुधवारी आमच्या गावात जरा जास्तच गजबज जाणवायला लागते. हा दिवस असतो आमच्या आठवडी बाजाराचा. आमच्या गावापासून नऊ किलोमीटरवर पाचल नावाच्या गावी हा बाजार दर बुधवारी भरतो. फक्त आमच्याच नाही तर पाचलची पंचवीस किलोमीटरच्या परिसरातील गावांमधून लोक या बाजारासाठी येतात. […]

ख्याली – खुशाली

साधे -सुधे पोस्त कार्ड , आंतरदेशीय-पत्र  आणि पाकिटे ” यातून एकमेकांना ख्याली-खुशाली “कळवली जात असे. घरातील वडीलधार्या व्यक्तींनी पत्रातील मजकूर वाचून सगळं खुशाल आहे बरं का ! असे भरल्या आवाजात सांगितले की ..भरलेले डोळे पदराने कोरडे करून मोठ्या समाधानाने ..घरातली  बाई-माणसं पुन्हा कामाला लागत . […]

1 7 8 9 10 11 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..