नियतीने हा वन डाऊन चा मार्ग माझ्यासाठी पुढे अनेकदा निवडून ठेवला होता आणि थेट सिक्कीम, भूतान , आसाम पर्यंत या गाडीच्या मदतीने माझे पाय लागले. आता वन डाऊन च्या तोडीची गीतांजली व दुरांतो एक्सप्रेस या गाड्या दिमतीला आहेत. परंतु आजही वन डाऊन नागपुर मेल तशीच रुबाबात आपला प्रवास करीत आहे. […]
माझे मूळ गाव खामगाव तालुक्यामधील आंबेटाकळी आहे. प्राथमिक शिक्षण गावातच झालेले असून गावाचे वैशिष्ट्ये म्हणजे, नावाप्रमाणे आंबेटाकळी शिवारात आमराई होत्या. त्या लोप पावल्या असल्या तरी आठवणी मात्र कायम आहेत. याविषयी… […]
दत्तूकाका व माझे वडिल अनेक वर्षे खडकपूरला सुट्टीमध्ये जातच राहिले. मोठी रेल्वे कॉलनी. रोज निरनिराळ्या गाड्यांच्या गप्पा त्यातही वन डाऊन विशेष चर्चेत असे. गाड्यांचे टाईमटेबल व त्या लेट का होतात यावर तासन्तास काथ्याकूट. या सर्व मार्याचा दत्तूकाकांच्या मनावर असा काही जबरदस्त पगडा बसला की त्यांनी चक्क इंजिनमधील फायरमनची नोकरी पकडली. […]
आता मात्र दिवस पार बदललेत. रस्त्यावर फक्त अनोळखी गर्दी, गर्दी आणि गर्दी. ओळखीचे चेहरे शोधावे लागतात. अठरा पगड जातीतील आणि वेगवेगळ्या प्रांतातून आलेली माणसे ओसंडून वाहत आहेत. प्रत्येकाचे वागणे वेगळे. मराठीपण कधीच संपून गेले. […]
मुंबईहून नागपूर मार्गे कलकत्त्याला जाणारी ही एक महत्त्वाची व तितकीच मानाची गाडी. त्यामुळे तिला नंबर सुध्दा होता वन डाऊन टु अप. काळाप्रमाणे आता हे नंबर बदललेले आहेत. […]
रत्नागिरी जिल्ह्यातलं राजापूर तालुक्यातलं ताम्हाणे हे आमचं बारा वाड्यांचा छोटस गाव. आमच्या गावाला रोज लवकरच जाग येते तरीही दर बुधवारी आमच्या गावात जरा जास्तच गजबज जाणवायला लागते. हा दिवस असतो आमच्या आठवडी बाजाराचा. आमच्या गावापासून नऊ किलोमीटरवर पाचल नावाच्या गावी हा बाजार दर बुधवारी भरतो. फक्त आमच्याच नाही तर पाचलची पंचवीस किलोमीटरच्या परिसरातील गावांमधून लोक या बाजारासाठी येतात. […]
साधे -सुधे पोस्त कार्ड , आंतरदेशीय-पत्र आणि पाकिटे ” यातून एकमेकांना ख्याली-खुशाली “कळवली जात असे. घरातील वडीलधार्या व्यक्तींनी पत्रातील मजकूर वाचून सगळं खुशाल आहे बरं का ! असे भरल्या आवाजात सांगितले की ..भरलेले डोळे पदराने कोरडे करून मोठ्या समाधानाने ..घरातली बाई-माणसं पुन्हा कामाला लागत . […]
मित्र हो , एकच एक गाव आणि एकच एक शाळा , अशी दीर्घ आणि घट्ट मैत्री “असे मी अनुभवले नाहीये .पण अनेक गावं ,अनेक शाळा , अनेक मित्र .आणि मैत्रीची विविध रूपे मी अनुभवली ,या अनुभावंनी मला घडवले . […]
भारतातील रेल्वेची मुहुर्तमेढ जिथे रोवली गेली ते बोरीबंदर स्थानक म्हणजे नगर चौकातले एक महत्त्वाचे आकर्षण. दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेले हे स्थानक आता “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” या नावाने ओळखले जात असले तरी अजूनही अनेकांच्या तोंडत व्ही.टी. स्टेशन (व्हिक्टोरिया टर्मिनस) हेच नाव बसलेले आहे. […]
टाऊन हॉल ते फाऊंटनचा परिसर हा इथला एक टप्पा. हा “टाऊन हॉल” म्हणजेच सध्या आपण बघतो ती “एशियाटिक लायब्ररी”ची सुंदर इमारत. ही इमारत “दोरिक” या जुन्या ग्रीक शैलीत बांधली असून तीला ३० पायर्या आहेत. […]