गरज आहे, एकत्र येऊन खच्चून बोंब ठोकण्याची!
अनेक ठिकाणी किंवा प्रत्येक ठिकाणी शेवटी शेतकरीच नागविला जातो. त्याला कारण शेतकर्यांमध्ये एकी नाही, दूरदृष्टी नाही, हिंमत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बोंबा मारण्याची शक्ती नाही. सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारविरुद्ध एल्गार पुकारला तर सरकारला शेवटी झुकावेच लागेल. उत्तरप्रदेशातील शेतकर्यांनी केंद्र सरकारला भूसंपादनचा नवा कायदा तयार करण्यास भाग पाडले ते आपल्या संघटीत आंदोलनाच्या जोरावरच; किमान त्यापासून तरी इकडच्या शेतकर्यांनी धडा घ्यावा!
[…]