हो (ही) आणि नाही (ही) !
यशाबद्दल बोलताना हमखास दोन दावे केले जातात- वाटेवर येणाऱ्या प्रत्येक संधीला हो म्हणाल तर यशस्वी व्हाल ही पहिली विचारसरणी ! याउलट ठामपणे नकार देता आला तर आयुष्यात बरंच काही इप्सित साध्य होऊ शकतं असं मानणारा दुसरा गट! […]
यशाबद्दल बोलताना हमखास दोन दावे केले जातात- वाटेवर येणाऱ्या प्रत्येक संधीला हो म्हणाल तर यशस्वी व्हाल ही पहिली विचारसरणी ! याउलट ठामपणे नकार देता आला तर आयुष्यात बरंच काही इप्सित साध्य होऊ शकतं असं मानणारा दुसरा गट! […]
मिलते हैं फिर ! रात्री झोपताना स्वतःला हे आश्वासन देऊन झोपण्याची माझी सवय आहे. आणि सकाळी डोळे उघडले की चक्क स्वतःशी भेट होते. पण हे वाक्य दरवेळी इतकं सहजी सत्यात येत नाही. […]
गुलज़ारचा ऐकीव दिनक्रम (म्हणजे माझ्या कानी आलेला)- रोज सकाळी सारं आवरून तो त्याच्या लेखन टेबलावर नियमित बसतो आणि नेटाने लेखन करीत असतो. मीही ती दैनंदिन शिस्त स्वतःला बऱ्यापैकी लावत आणलीय. विशेषतः फेब्रुवारी २०२० पासून सुरु झालेल्या स्तंभलेखनाने (हा आयुष्यातील पहिलाच लेखनप्रकार) मला सातत्याची शिस्त लावलीय. घड्याळ असते सोलापूरला पण दर शुक्रवारी नवा लेख लिहायला सुरुवात करून तो सोमवार रात्रीपर्यंत पाठविला तरच तो पुढच्या रविवारी येतो हे नवं आक्रीत आता अंगवळणी पडलंय आणि जमतंय. […]
आज विद्या सिन्हाची स्मृती डोकावली – रजनीगंधा, छोटीसी बात वाली ! पण तात्काळ कवाडे बंद करत मी अलिप्त /तटस्थपणा चेहेऱ्यावर विणला. थोडासा विलगलो पण आठवणींचे पार पिच्छा सोडत नाहीत.नेमाने उगविले-मावळले त्याच्यासारखे तर कदाचित जमेल. प्रयत्न करून बघावे म्हणतोय. […]
१९६५ साली आजीच्या आग्रहाखातर वडिलांनी आई,मी आणि धाकटा भाऊ यांच्या समवेत पहिली कुलदेवतेची यात्रा योजिली तेव्हा भुसावळ-तुळजापूर हा द्राविडी (का द्रविडी) प्राणायामी प्रवास होता. […]
भुसावळमध्ये असताना प्राथमिक शाळेला “बालवाडी वा शाळा” आणि माध्यमिक शाळेला “हायस्कूल ” म्हणणारा मी ऑगस्ट ७४ ला सोलापूर नामक महानगरात पाऊल टाकल्यावर “प्रशाला “या नव्या शब्दाला भेटलो. […]
आज हे पत्र लिहायलाच हवं. एक वर्ष उशीर झालाय. मागील गुरुपौर्णिमेला संकल्प सोडला होता या पत्राचा आणि वर्षभरानंतर तो पूर्ण होतोय. उशिराला कारण काहीच नाही. सारंगकडून तुमचा पत्ता मिळाला पण तो लिफाफ्यावर असणार. आतमध्ये काय? हे सगळं “आतलं ” तुमच्यासारख्या गुरुजनांनी दिलेल्या ओसंडून वाहणाऱ्या पोतड्यांची देणगी आहे. हे व्यक्त व्हायला गुरुपोर्णिमेसारखा मुहूर्तच हवा. […]
मागे वळून बघण्याच्या वयात आल्यानंतर सगळ्यांनाच स्नेहमेळाव्याची/बालपण भेटण्याची ओढ लागते. आम्ही त्याला अपवाद नाही. माझ्याकडे भेटीचे असे तीन पर्याय आहेत- भुसावळचे शाळूसोबती, सोलापूर हदे चे मित्र आणि सांगलीच्या वालचंदचे स्नेहगडी ! संधी मिळेल तशी मी प्रत्येक पाणवठ्यावर हजेरी लावत असतो. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions