ओरड की पोटशूळ?
ज्या ज्या वेळी महागाई भडकल्याने लोकांचे जीणे हराम झाल्याचे चित्र उभे केले जाते, त्यावर आंदोलने केली जातात, सरकारला महागाई रोखण्यासाठी पावले उचलणे भाग पाडले जाते त्या त्या वेळी या महागाईचा संबंध केवळ कृषी उत्पादनांशी असतो. भाजीपाला, कांद्याचे वगैरे भाव वाढले की लगेच लोकांचे जीणे दुष्कर होऊन जाते, विरोधी पक्षांच्या घशाखाली घास उतरत नाही आणि सरकारलाही नीट झोप लागत नाही. या उत्पादनांचे भाव वाढून चार पैसे शेतकऱ्यांच्या घरात गेले तर किती मोठे संकट उभे राहणार, या विचारानेच सगळे अस्वस्थ होतात.
[…]