नवीन लेखन...

खरच प्रगती होईल?

आज चीन म्हणजे अमेरिकेलाही धाकात ठेवणारी ‘सुपर इकॉनॉमिक पॉवर’ ठरली आहे, त्या तुलनेत भारत कुठेच नाही. भारतातील भ्रष्ट प्रशासकीय व्यवस्था हे त्यामागील एक मोठे कारण आहे. अनेक लोकोपयोगी प्रकल्प या भ्रष्ट व्यवस्थेने अक्षरश: पोखरून काढले आहेत.
[…]

उपद्रवी ते निरूपद्रवी

वर्गसंघर्ष हा प्रकार कोणत्याही समाजाला नवीन नाही. मग तो समाज युरोप-अमेरिकेतील एखाद्या अतिविकसित राष्ट्रातला असो, अथवा आप्रि*केतील एखाद्या मागासलेल्या राष्ट्रातला असो; वर्गसंघर्ष प्रत्येक ठिकाणी असतोच आणि साधारणत: त्याचे स्वरूप ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ असेच असते. प्रत्येक ठिकाणी या वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे समाजघटक, वर्ग, गट किंवा लोक वेगवेगळे असू शकतात, परंतु संघर्षाचे स्वरूप ढोबळमानाने हेच असते.
[…]

शेतकर्‍यांनी नक्षलवादी व्हावे काय?

सरकारने आधी शेतकऱ्यांना रासायनिक शेतीचा पाठ पढवित त्यांच्या पायातील बळ हिरावून घेतले, त्यांना कुबड्या दिल्या आणि आता खते, बियाण्यांची टंचाई निर्माण करून या कुबड्याही हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. विवश शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय आहे? त्यांनाही तुम्ही गोळ्या घालणार?
[…]

अधोगती सरकारमुळेच!

महागाईचे हे चक्र अशा विचित्र गतीने फिरत आहे की, महागाईचा फायदा कुणालाच होताना दिसत नाही. अन्नधान्याची महागाई वाढली तर किमान शेतकऱ्यांना तरी फायदा व्हायला हवा, परंतु तसेही दिसत नाही. चलनवाढ झाली असेल तर स्वाभाविकच कराच्या रूपाने सरकारी तिजोरीत अधिक पैसा जमा व्हायला हवा, तसा तो होत असेलही, परंतु त्या पैशाचा उपयोग विकासकामासाठी व्हायला हवा, तसे होताना दिसत नाही.
[…]

कुटुंब नियोजन,सरकारी स्टाईल!

शारीरिक स्वास्थ्याचा थेट संबंध आहार आणि आरोग्यविषयक सवयींशी आहे. आज आमच्या आहारात रासायनिक विषाचे प्रमाण
इतके वाढले आहे की आजच्या पिढीची एकूणच शारीरिक क्षमता अगदी खालावत गेली आहे. आजारांचे, विकारांचे प्रमाण
वाढले, रोगप्रतिकारक शत्त*ी कमी झाली आणि त्याचा थेट परिणाम पुरुषांच्या ‘पुरुषत्वावर’ आणि स्त्तियांच्या ‘मातृत्वावर’ झाला.
[…]

तुला सलाम!

आम्ही ना धड शेतीला न्याय देऊ शकलो, ना धड उद्योगांना. कायमच्या दुर्लक्षामुळे शेती कोलमडून पडली आणि दिशाहिन नियोजनामुळे उद्योगांचे तीन-तेरा वाजले. त्याचा परिणाम आज दिसून येत आहे.
[…]

इकडे आड तिकडे विहीर

जेव्हा देशाच्या विकासाचा प्रश्न येतो तेव्हा आर्थिक स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. देशाची अर्थव्यवस्था मजबूत असेल तरच तो देश अनेक संकटांवर मात करू शकतो आणि अनेक संकटांना दूर ठेवू शकतो.

आपल्या देशाचे वर्णन करताना अनेक चांगली विशेषणे कवींनी, साहित्यिकांनी वापरली आहेत.
[…]

करावे तरी काय?

आपल्याकडे निष्क्रियता हा अपराध नाही, उलट त्याचे कौतुकच होते. एखाद्याने काही कल्पकता दाखवून वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तो अपराध ठरतो. सव्वाशे कोटींचा हा देश आहे.
[…]

अवडंबर !

गेल्या साठ वर्षांपासून आपला देश अजूनही विकसनशील अवस्थेतच आहे आणि आपल्या मागे असलेले अनेक देश या शर्यतीत आपल्या खूप पुढे गेले आहेत. यामागचे मुख्य कारण आपली मानसिकता हेच आहे. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे, कोणत्या गोष्टींचा संबंध राष्ट्राभिमानाशी जोडायचा याचे आपल्याकडे काही तारतम्यच नाही.
[…]

अत्र तत्र सर्वत्र

मायणातील एक गोष्ट सर्वविदित आहे. वाटमारी करून लोकांना त्रस्त करणाऱ्या वाल्याला तुझ्या या कामाला तुझ्या कुटुंबीयांचे समर्थन आहे का, तुझ्या पापात ते वाटेकरी आहेत का, असे नारदाने विचारले. वाल्याने आपल्या कुटुंबीयना यासंदर्भात विचारले असता त्याच्या पापात आपण सहभागी नसल्याचे त्यांनी सांगितले.
[…]

1 23 24 25 26 27 51
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..