नवीन लेखन...

स्लो पॉयझनिंग

तकऱ्यांच्या आत्महत्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात होते आणि ती व्हायलाही हवी, कारण मुळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारच्या धोरणात्मक नीतीचा परिणाम आहे. सरकार अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. हा सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा आहे.
[…]

बागुलबुवा महागाईचा

ध्या भारतात चर्चा केवळ महागाईची आहे. विरोधी पक्षांना महागाईच्या रूपाने आपल्या तलवारी पाजळण्यासाठी चांगला मुद्दा मिळाला आहे आणि तिकडे सरकारही प्रचंड अस्वस्थ आहे. महागाई सध्या राष्ट्रीय संकट ठरले आहे.
[…]

खिचडीची बाधा

रेंद्र मोदी या नावाला आंग्लाळलेल्या आणि पक्षीय भाटगिरी करणाऱ्या प्रसार माध्यमांनी केवळ अतिरेकी हिंदुत्ववादी या एकाच रंगात रंगविण्याचे काम सातत्याने केल्यामुळे एखाद्याने मोदींचे नाव घेतले की लगेच त्याच्याकडे संशयाने पाहण्याची लोकांची मानसिकता झाली आहे. नरेंद्र मोदींची राजकीय भूमिका काय आहे, त्यांचा हिंदुत्ववाद काय आहे किंवा धर्मनिरपेक्षतेबद्दल त्यांचे काय विचार आहे, हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी कितपत यशस्वी ठरले यावर चर्चा करण्यात, राज्याच्या विकासाच्या संदर्भात त्यांची कामगिरी कशी आहे यावर विचार करण्यास हरकत काय आहे? परंतु मोदी म्हटले की गोध्रा आणि त्यानंतरची दंगल या पलीकडे जाण्यात बऱ्याच जणांना फारसे स्वारस्य नसते.
[…]

पोकळ ढोल

केंद्र सरकारची ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या पॅकेजच्या मार्गानेच जाणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या कर्जमाफीमुळे ना आर्थिक स्वरूपाचा, ना मानसिक स्वरूपाचा असा कसल्याही प्रकारचा दिलासा आत्महत्याठास्त भागातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी घोषित झालेल्या कर्जमाफी योजनेनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.
[…]

हताशेला पर्याय काय?

माझ्या निर्देशांचे काय होते, हे तुम्हाला ठाऊक आहे. अशा परिस्थितीत मंत्र्यांना निर्देश देण्याचा आठाह माझ्याकडे कशाला धरता?, ‘ या सरकारचा कारभार म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पिठ खातंय’ असा आहे.
[…]

कर्जमुक्ती नव्हे मते मिळविण्याची युक्ती

सरकारची बहुप्रतीक्षित कर्जमाफी अखेर घोषित झाली आणि अपेक्षेप्रमाणे ती प्रचंड गोंधळाच्या स्वरूपात राहिली. साठ हजार कोटींच्या या कर्जमाफीमुळे चार कोटी शेतकरी लाभान्वित होतील असा सरकारचा दावा आहे, प्रत्यक्षात साठ लाख शेतकरी तरी कर्जमुत्त* आणि चितामुत्त* होतील की नाही याचीच शंका आहे. आत्महत्याठास्त भागातील शेतकऱ्यांना एकवार कर्जमुत्त* करावे ही मागणी सुरुवातीला 2001 सालापासून आम्हीच लावून धरली.
[…]

म्हातारा मेल्याचे दु:ख नाही

वृत्तपत्रे समाजाचा आरसा असतात, समाजातील गरीब, पीडित, शोषित लोकांचा आवाज म्हणजे वृत्तपत्रे, सरकारची, प्रशासनाची सामान्य जनतेशी नाळ जोडणारे माध्यम म्हणजे वृत्तपत्रे, आदी अनेक विशेष गुणांद्वारे वृत्तपत्रांचे कौतुक केले जायचे. केले जायचे एवढ्याचसाठी की आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. एकेकाळी वृत्तपत्रे खरोखरच एक जबरदस्त ताकद म्हणून ओळखली जायची.
[…]

मराठी बाणा महाराष्ट्राबाहेर फुलवणे हाच पर्याय !

गेले दोन-चार दिवस मुंबईत प्रचंड राडा सुरू आहे. हा लेख तुमच्या हाती पडेपर्यंत कदाचित परिस्थिती निवळली असेल, परंतु आतमध्ये धुमसणारा सुप्त असंतोष शांत व्हायला वेळ लागेल. कदाचित होणारही नाही.
[…]

बदल विकासाचा आत्मा

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी मातृतिर्थ सिंदखेड राजा इथे जनसागर उसळला होता. अक्षरश: लाखो लोक तिथे जमले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात स्वत:ची एक वेगळी वाट, स्वत:चा एक वेगळा प्रवाह निर्माण करणाऱ्या मराठा सेवा संघाने, अर्थात पुरूषोत्तम खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवधर्माची दिक्षा घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
[…]

1 24 25 26 27 28 51
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..