नवीन लेखन...

नवी ओळख पुसून टाका!

जगात अब्जावधी लोक आहेत, परंतु तरीसुद्धा एका व्यक्तीसारखी हुबेहूब दुसरी व्यक्ती असणे शक्य नाही. अगदी जुळ्या मुलांमध्ये देखील सूक्ष्मसा फरक असतोच. सांगायचे तात्पर्य, प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र ओळख असते. […]

धोरण बदलण्याची गरज!

स्वातंत्र्याचे साठावे वर्ष सगळ्याच नेत्यांनी ‘चिंता वर्ष’ म्हणून साजरे करायचे ठरविलेले दिसते. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या विषयावर चिंता व्यत्त* करताना दिसत आहे. ज्याला कोणताच विषय सुचत नाही त्याच्यासाठी ‘शेतकऱ्यांची दयनीय अवस्था’ हा विषय ठेवलेलाच आहे.
[…]

“ते” खातात तुपाशी…!

पाचव्या वेतन आयोगाने सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या भरपेट भोजनाची ढेकर अजून विरत नाही तोच केंद्र सरकारने सहाव्या वेतन आयोगाचे गठन करून आपल्या लाडक्या लेकरावरचे प्रेम जगजाहीर केले आहे. सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताची जितकी काळजी घेते त्या तुलनेत इतर 95 टक्के जनतेची केवळ एक टक्काही काळजी सरकारने घेतली असती तर कुणाची काहीच तक्रार राहिली नसती; परंतु दुर्दैवाने परिस्थिती तशी नाही. आपल्या कर्मचाऱ्यांचा विचार करताना सरकार जीवनमानाच्या ज्या कल्पना निर्धारित करते इतरांच्या संदर्भात मात्र सरकार त्या कल्पनांच्या जवळपासही फिरकत नाही ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. […]

“इंडिया दॅट इज भारत”

आम्हा भारतीयांना दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिण्याची जणू सवयच लागली आहे. कुणीतरी दुसऱ्याने कान टोचल्याशिवाय आम्हांला शहाणपण येत नाही. विविधता ही खरे तर आपल्या देशाची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणता येईल.
[…]

करंट्यांचा देश

भारताची वाढती लोकसंख्या शाप आहे की वरदान हा वादाचा विषय होऊ शकतो. सध्या प्रचलित असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त मतप्रवाहानुसार वाढती लोकसंख्या शाप ठरत असली तरी थोड्या वेगळ्या अंगाने विचार केल्यास ही वाढती लोकसंख्या भारतासाठी वरदान ठरू शकते. लोकसंख्या वाढत आहे म्हणजे खाणारी तोंडे वाढत आहेत, असाच विचार केला जातो; परंतु त्याचवेळी काम करणारे दोन हातदेखील वाढत आहेत, याकडे दुर्लक्ष केले जाते.
[…]

बळीराजाच्या नावानं चांगभलं!

ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांना विचारले तर ते हेच सांगतील की एखाद्या व्यत्त*ीच्या जीवनातील सर्वाधिक खडतर काळाची लांबी साडेसात वर्षापेक्षा अधिक असू शकत नाही आणि अशा दोन कालखंडातील अंतर किमान बावीस वर्षे असते. शनि या सर्वाधिक पिडादायक ठाहाच्या भ्रमंतीचा आणि मुक्कामाचा हा कालखंड आहे. एका राशीला शनि एका कालखंडात अधिकाधिक साडेसात वर्षे त्रास देऊ शकतो आणि त्या राशीची शनिशी पुन्हा भेट नंतर साडे बाविस वर्षांनीच होते.
[…]

पंतप्रधान आले अन् गेले!

हा लेख तुमच्या हातात पडेपर्यंत पंतप्रधानांचा विदर्भ दौरा आटोपला असेल, या दौऱ्याची फलश्रुती तुमच्या समोर असेल; परंतु हा लेख लिहीत असताना पंतप्रधानांचा दौरा सुरू झालेला नव्हता. त्यामुळे पंतप्रधानांच्या या दौऱ्याने विदर्भाला काय मिळेल, ते कितपत परिणामकारक ठरेल याचा इथे केवळ अंदाज करणे शक्य आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या पंतप्रधानांना कुठेतरी अस्वस्थ करून गेल्या आणि म्हणूनच त्यांनी इथल्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा, इथल्या लोकांच्या समस्या थेट त्यांच्याकडूनच समजून घेण्याचा निर्णय घेतला यात शंका नाही. […]

“मोले घातले रडाया….”

एखाद्या व्यत्त*ीचे निधन झाल्यावर त्याच्या आप्तस्वकीयांना दु:ख होणे स्वाभाविक असते. डोळ््यांतील अश्रूंची वाट मोकळी करून हे दु:ख व्यत्त* केले जाते. दु:खाचा तो स्वाभाविक उद्रेक असतो परंतु बरेचदा असेही आढळून येते की, मृत व्यत्त*ीशी कुठलेही भावनिक संबंध नसलेली माणसेही आपल्या न झालेल्या दु:खाचे अतिरेकी प्रदर्शन करीत असतात.
[…]

1 31 32 33 34 35 51
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..