नवीन लेखन...

विध्वंसाचे जीन्स!

पुराणात प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या त्रिशंकू राजाची कथा आहे. साक्षात सृष्टी नियंत्या ब्रह्याला आव्हान देणाऱ्या या त्रिशंकूची अवस्था अखेर काय झाली हे सगळ््यांनाच माहीत आहे. त्या त्रिशंकूचेच आधुनिक अवतार आता विज्ञानाच्या शिडीचा वापर करून प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
[…]

मर्यादा आणि क्षमता!

समाजात वावरताना आपल्याला बरेचदा असे आढळून येते की, काही लोकांमध्ये प्रचंड क्षमता असूनही ते आपल्या क्षमतेला योग्य न्याय देऊ न शकल्याने गरिबीत किंवा अडचणीत दिवस काढत असतात, तर काही लोकांच्या वकुबाला बऱ्याच मर्यादा असूनही ते आपल्या क्षमतांचा योग्य उपयोग करून यशस्वी जीवन जगत असतात. विचारसरणीतील किंवा दृठिकोनातील फरकामुळेच हा भेद निर्माण झालेला असतो. ‘ग्लास अर्धा भरला आहे’ आणि ‘ग्लास अर्धा रिकामा आहे’ या दोन वैचारिक दृठिकोनांत सर्वसामान्य लोकांची विभागणी करता येईल.
[…]

पिकते तिथे विकत नाही!

जगात सर्वाधिक समृद्ध परंपरा, संस्कृती आणि इतिहास लाभलेला देश म्हणून भारताला ओळखले जाते. भारताची ही ओळख अनाठायी म्हणता येणार नाही. जगात क्वचितच एखाद्या सभ्यतेला किंवा संस्कृतीला भारतीय संस्कृतीइतका विशाल वारसा लाभला असेल.
[…]

तरच भारत महान !

सामाजिक, राजकीय विचारांच्या बाबतीत आपल्या देशात जेवढा गोंधळ दिसतो तेवढा इतर कोणत्याही देशात दिसत नाही. विचारातला हा विरोधाभासच अनेक बाबतीत आपल्या प्रगतीतील एक मोठा अडसर ठरला आहे. अनेक समस्यांचे मूळ भारतीयांच्या, विशेषत: राजकारण्यांच्या, उक्ती आणि कृतीतील महद्ंतरातच आहे.
[…]

मुलभूत समस्या !

भारताला जागतिक महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्याचे प्रयत्न अगदी जोरात सुरू आहेत. येत्या पंधरा वर्षांत भारताची ओळख ‘सुपर पॉवर’ म्हणून स्थापित करण्यासाठी सगळ््या नेत्यांनी अगदी कंबर कसल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेशी नुकत्याच करण्यात आलेल्या आण्विक कराराकडे त्या दृष्टीनेच पाहिले जात आहे.
[…]

हेही नसे थोडके !

सध्या देशात विशेषत: महाराष्ट्रात, बर्ड फ्लूचा आतंक माजला आहे. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी सरकारी स्तरावर प्रचंड धावपळ सुरू आहे. लाखोंच्या संख्येने कोंबड्या मारल्या जात आहेत.
[…]

सरकारचा बोलविता धनी कोण?

फ्रेंच नौदलाच्या क्लेमेंस्यु या जहाजाची उपयुत्त*ता संपल्यामुळे हे जहाज तोडण्यासाठी गुजरातमधील अलंग शिप ब्रेकिंग यार्डमध्ये पाठविण्यात आले होते. या जहाजात मोठ्या प्रमाणात अॅस्बेस्टॉस असल्यामुळे प्रदुषणाचा मोठा धोका निर्माण झाला असता. हा धोका लक्षात घेऊनच क्लेमेंस्युला भारतीय सागरी हद्दीत प्रवेश देऊ नये अशी जोरदार मागणी पर्यावरणवाद्यांनी केली.
[…]

काल, आज आणि उद्या !

आंबेडकरी साहित्यासमोरील आव्हान!
परिवर्तन हा जगाचा स्थायीभाव आहे. संपूर्ण जग सतत बदलत असते.
[…]

राज्य विकायचे आहे!

लोकशाही व्यवस्थेत सरकारचे काम विश्वस्तांचे असते. राज्याचे खरे मालक राज्याचे नागरिक असतात या नागरिकांच्या वतीने सरकार राज्याचा कारभार पाहत असते. त्यामुळे सरकारची जबाबदारी केवळ संरक्षण आणि संवर्धनापुरतीच मर्यादित आहे; परंतु आपल्या या मर्यादेचा सरकारला विसर पडला की काय, अशी शंका आता येऊ लागली आहे.
[…]

1 33 34 35 36 37 51
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..