यापेक्षा सरळ गोळ्याच घाला
प्रकाशन दिनांक :- 30/03/2003
आपल्या देशात सध्या सर्वाधिक महाग वस्तू काय आहे, असा प्रश्न कोणी केलाच तर चटकन सेकंदाचाही वेळ न लावता उत्तर समोर येईल, ते म्हणजे ‘जगणे’. अर्थात हे उत्तर राजकारणी आणि नोकरशाही या जमातीला लागू पडत नाही कारण या महागाईचे उद्गाते ते स्वत:च आहे. ज्याच्या हाती पलिता आहे तो स्वत:ला त्याची आच कशी लागू देईल?
[…]