नवीन लेखन...

शेतकऱ्यांचे सारेच शत्रू !

शेतकरी संघटित झाले, तर सरकारला त्यांच्या पायाशी लोळण घेणे भाग पडेल, परंतु तसे होऊ नये याची सरकार पुरेपूर काळजी घेत असते आणि म्हणूनच शेतकऱ्यांना विभाजित करून त्यांच्यातच संघर्ष निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. हे कमी की काय म्हणून खते, बियाणे वगैरेंचा पुरवठा करणारे व्यापारीही त्याला लुटण्यासाठी सज्ज असतात. त्यामुळे शेवटी प्रश्न उरतो तो शेतकऱ्यांच्या हिताची काळजी […]

हा जुगार तुम्ही खेळून बघा !

शेतकरी दरवर्षी जुगार खेळतात. हाती असेल नसेल तितके शेतीत गुंतवतात, पाऊस-पाणी चांगले झाले, पिकांना थोडा बरा भाव मिळाला, तर किमान गुंतविले तितके तरी वापस येण्याची आशा असते, नफा हा प्रकार तर त्यांच्यासाठी बादच आहे आणि निसर्गाने दगा दिला, तर होत्याचे नव्हते होऊन तो भिकेकंगाल होतो. परत पुढच्या वर्षी कर्ज काढून असाच जुगार खेळला जातो, एक दिवस […]

न्याय मिळेल का न्याय?

या देशाच्या संविधानाने सामान्य लोकांना न्याय देणारे अनेक कायदे, नियम तयार केले आहेत, त्यांचे प्रामाणिकपणे पालन झाले, तरी अनेक पीडितांना सहज न्याय मिळू शकेल; परंतु हे कायदे, नियम बासनात गुंडाळून नोकरशाही आपली समांतर न्यायव्यवस्था चालविते आणि त्यात लाच दिल्याखेरीज कोणतेही काम होत नाही. खरेतर ही अनागोंदी संपविण्याचे काम निस्वार्थी, नि:स्पृह आणि धाडसी राजकीय नेतृत्वच करू शकते. […]

शिक्षण क्षेत्र शुध्दीकरणासाठी श्रीकृष्णाची गरज!

समाजाला आज खर्‍या गुरूजींची गरज आहे. संस्था चालकांना भरमसाठ पैसे देऊन या पवित्र पेशात घुसलेल्या; भावी पिढी बरबाद करणार्‍या आणि वरून गुरूजनाचे नकली कातडे पांघरलेल्या कोल्ह्यांना हाकलून शिक्षणाचे हे पवित्र क्षेत्र शुद्ध करायला “श्रीकृष्ण” म्हणून पुढे कुणी येईल का? 
[…]

धोरणातील विसंगती !

खरे तर शेतकर्‍यांना सरकारी कार्यालयात बोलाविण्याऐवजी सरकारनेच शेतकर्‍यांच्या दारात जायला पाहिजे. शेतकर्‍यांना घरपोच सगळी कागदपत्रे मिळायला हवीत, पात्र शेतकर्‍यांना कोणतीही दगदग  न करता सगळी अनुदाने विनासायास मिळायला हवीत; परंतु तसे होत नाही
[…]

बहिष्काराचे शस्त्र उपसा !

बहिष्कार हे एक उत्तम शस्त्र आहे. लोकांनी या स्पर्धेकडे पाठ फिरविली तर ही स्पर्धा बंद पडायला वेळ  लागणार नाही.एरवी क्रिकेटमधील सट्टेबाजीबद्दल तावातावाने बोलणारे लोक संध्याकाळ झाली की आवर्जून टीव्हीसमोर बसतात आणि सामना पाहतात. लोकांच्या या दोगल्या वृत्तीमुळेच अनैतिक काम करणार्‍यांचे फावत असते.
[…]

भारत उद्ध्वस्त करण्यासाठी सर्व सज्जता !

शेतकर्‍यांना नेस्तनाबूद करून त्यांच्या जमिनी बहुराष्ट्रीय कंपन्यांना “कॉन्ट्रक्ट” पद्धतीने द्यायचा घाट घातला जात आहे. हे एक विशाल षडयंत्र आहे. केवळ ग्राहक किंवा खरेदीदार असलेला “इंडिया” शाबूत ठेवून उत्पादक भारत नष्ट करण्याचा कट शिजविला जात आहे.
[…]

अनुदाने आणि मदत!

थोडक्यात अनुदान आणि मदतीच्या नावाखाली दलाल, एजंट, ठेकेदार, राजकीय कार्यकर्ते या सगळ्यांना पोसणारी एक प्रचंड यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या यंत्रणेत प्रशासकीय अधिकार्‍यांनाही सामील करून घेतले जाते आणि त्यात भरडला जातो तो ज्याच्या नावाखाली हा सगळा व्याप उभा झालेला असतो
[…]

भरकटलेली संवेदनशीलता !

ज्या संवेदनशीलतेचा आपण अतिशय कौतुकाने उल्लेख करतो, ती संवेदनशीलता, मग ती सामान्य माणसाची असो, राजकीय पक्षांची असो, माध्यमांची असो अथवा सरकारची असो, आपल्या सोयीनुसार, स्वार्थानुसार बदलत असते. आपली संवेदनशीलताच सर्वाधिक असंवेदनशील झाली आहे आणि हेच खरे दु:ख आहे.
[…]

सर्व काही केवळ प्रसिद्धीसाठी!

लहान माणसाची सावली मोठी होऊ लागली, की सूर्यास्त जवळ आला असे समजावे, असे म्हटले जाते. आपल्या देशाची तीच अवस्था झाली आहे. मोठ्या पदावर बसलेल्या लहान माणसांच्या सावल्या दिवसेंदिवस मोठ्या होत आहेत.
[…]

1 2 3 44
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..