नवीन लेखन...

सुपारीबाज नेते!

अलीकडील काळात भारतातले अनेक उद्योग झपाट्याने बंद पडत असले, उद्योजक बेकार होत असले तरी एक धंदा मात्र अगदी जोरात सुरू आहे आणि त्या धंद्याला मरणही नाही, कुठला धंदा म्हणून काय विचारताय? अहो, तो धंदा म्हणजे राजकारण! पावसाळ्यातील छत्र्यांसारखे आपल्याकडे नेते उगवत असतात. […]

“पॅकेज” चे मृगजळ !

सध्या नागपुरात राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. कापूस उत्पादक पट्ट्यातील आणि त्यातही विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न या अधिवेशनात गाजत आहे. ‘गाजत’ हा खरोखरच यथार्थ वर्णन करणारा शब्द म्हणावा लागेल.
[…]

कटकारस्थान!

रासायनिक शेती मोठ्या प्रमाणात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दावणीला बांधल्या गेली आहे. महागडी बियाणे, खते, कीटकनाशके, शेतीचा उत्पादन खर्च अतोनात वाढवीत आहेत. मिळणाऱ्या उत्पन्नातून हा उत्पादनखर्च भागविण्यासाठी उचललेल्या कर्जाचे व्याजही फिटत नाही.
[…]

आजारापेक्षा उपाय अघोरा!

खेड्यापाड्यात अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे सध्या दणाणले आहेत. बातमीच तशी आहे; राज्याच्या गृहमंत्र्यांनी अशा सावकारांना अगदी कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याचे आदेशच पोलिस विभागाला दिले आहेत. आबांचाच आदेश म्हटल्यावर पोलिस कशाला सुस्ती करतात, ”खंडणी वसुली करायला त्यांना हातात आयतेच कोलीत सापडले. […]

शिखंडी राज्यकर्ते!

विदर्भातील कापूस पट्ट्यात सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा उद्रेक सुरू आहे.कापूस उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी नाही, असा एकही दिवस जात नाही. सरकारच्या सगळ्या कथित प्रयत्नानंतरही आत्महत्येचे प्रमाण कमी झालेले नाही, उलट ते वाढतच चाललेले दिसते.
[…]

जगण्यासाठी पिकवा!

हिरव्या बोंडातून फुलणारा पांढरा शुभ्र कापूस लहान मुलाच्या चेहऱ्यावरील निरागस हास्याची आठवण करून देतो; परंतु दैव विसंगती बघा, हाच कापूस शेकडो शेतकऱ्यांच्या घरात मृत्यूची काळी छाया बनून वावरतो आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य,त्यांच्या जीवनातला आनंद या पांढऱ्या कापसाच्या काळ्या छायेत पार वितळून गेला आहे. काल झाले ते आज होणार नाही,या वेड्या आशत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तीन पिढ्या बरबाद झाल्या.
[…]

लुटारूंनी लुटारुंसाठी…!

‘दारिद्र्य रेषा’ हा सरकारी भाषेतील एक नेहमी ऐकू येणारा शब्द. या रेषेचे काही निकष आहेत. हे निकष साधारणत: उत्पन्नाच्या संदर्भात असतात. […]

कोषातून बाहेर पडा!

भारताचा इतिहास चाळतो म्हटले तर इतिहासात ठिकठिकाणी, पानापानावर मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा ठसा उमटलेला दिसतो. लढाईचे मैदान असो अथवा साहित्याची मुलूखगिरी, मराठी माणसाचा आदराने उल्लेख केल्याशिवाय इतिहास पुढे सरकूच शकत नाही. अगदी अलीकडील काळापर्यंत ‘मराठी पाऊल’ सगळ्याच क्षेत्रात पुढेच होते.
[…]

भारतीय शेतीची नवी दिशा सेंद्रीय की जनुकीय?

ीकाही वर्षे दाखविलेल्या चमत्कारानंतर आता हरितक्रांतीचे पितळ उघडे पडले आहे. गेल्या 5 वर्षांपासून अन्नधान्याच्या उत्पादनात कुठलीही वाढ दिसून येत नाही. विशेषत: ज्या भागात सिंचनाच्या सुविधेमुळे हरितक्रांती यशस्वी झाल्याचा दावा केल्या जात होता तिथेच जमिनीची उत्पादकता ढासळल्यामुळे आता हरितक्रांती वाढणाऱ्या लोकसंख्येला पोसू शकेल का, हा प्रश्न सर्व विचारवंतांना पडला आहे.
[…]

होत्याचे नव्हते!

काळाच्या प्रवाहासोबतच मनुष्याची जीवनशैली बदलत चालली आहे आणि त्या बदलामागचे प्रमुख कारण ठरत आहे वैज्ञानिक प्रगती! वैज्ञानिक प्रगतीच्या खऱ्या वेगाला चालना मिळाली ती जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावल्यानंतर . जागतिक औद्योगिकीकरणाचा तो आरंभबिंदू होता.
[…]

1 27 28 29 30 31 44
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..