नवीन लेखन...

एकत्रित प्रयत्नांची गरज

प्रकाशन दिनांक :- 01/02/2004

‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, हे संतवचन निश्चितच प्रेरणादायी आहे. फक्त बदलत्या काळानुरूप या वचनात किंचित बदल सुचवावासा वाटतो. केवळ केल्याने काही होईल याची आता शाश्वती राहिलेली नाही.
[…]

दिशा बदलण्याची गरज

प्रकाशन दिनांक :- 25/01/2004
देशात सर्वत्र सध्या ‘फिल गुड’ चा बोलबाला आहे. एका मागोमाग एक घोषणांचा सपाटा लावीत सरकार प्रत्येकाला खूष करण्याच्या प्रयत्नात दिसते. तसेही निवडणुकीचे वर्ष असले की, सर्वसामान्य जनता खूष असतेच.
[…]

हारांमुळे विकासाची हार!

कधी-कधी योग्य बाबी अयोग्य प्रकारे हाताळल्यास त्याचे परिणाम किती विपरित होऊ शकतात, याचे मासलेवाईक उदाहरण म्हणून आपल्या लोकशाहीप्रधान शासन व्यवस्थेकडे अंगुलीनिर्देश करता येईल. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा समजला जातो. परंतु आपल्याकडे हे विकेंद्रीकरण करताना देशाच्या हिताला, विकासाला दुय्यम महत्त्व दिले गेले.
[…]

अगतिक देश, अगतिक पंतप्रधान!

प्रकाशन दिनांक :- 11/01/2004

देशाची प्रगती (जर झाली असेलच तर) कुणामुळे झाली हा कदाचित वादाचा मुद्दा होऊ शकेल; नव्हे तो वादाचाच मुद्दा आहे. परंतु प्रगतीची काही मोजकी क्षेत्रे वगळली तर इतर सर्व क्षेत्रात देशाची जी सर्वांगीण अधोगती झाली त्यासाठी मात्र भ्रष्ट राजकारणी आणि नोकरशहाच जबाबदार आहेत. हे केवळ आमचे मत नाही तर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीच तशी स्पष्ट कबुली दिली आहे.
[…]

आम्ही कंगाल का?

प्रकाशन दिनांक :- 04/01/2004

सध्या संपूर्ण जग समस्यांचे माहेरघर बनले आहे, यावर कुणाचे दुमत होण्याचे कारण नाही. आपल्या देशाच्या संदर्भात तर हे विधान कायम सिद्ध आहे. खरं तर मानवाच्या विकासाला या समस्याच कारणीभूत ठरल्या आहेत.
[…]

भ्रामक लोकशाही!

प्रकाशन दिनांक :- 28/12/2003

पूर्वीच्या काळी ताब्यात असलेल्या गडकोटावरून एखाद्या राज्याची, राजाची श्रीमंती ठरत असे. जितके जास्त किल्ले, दुर्ग वर्चस्वाखाली तितका तो राजा प्रभावी समजला जायचा. एखादा किल्ला ताब्यात असला की, आजुबाजूच्या मोठ्या परिसरावर सहज नियंत्रण ठेवता यायचे.
[…]

नसती उठाठेव!

प्रकाशन दिनांक :- 21/12/2003

‘सामर्थ्य आहे चळवळीचे’ ही समर्थांची उक्ती सर्वज्ञात आहे. निश्चितच चळवळीत सामर्थ्य असते. अशाच एका चळवळीच्या सामर्थ्यातून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
[…]

दारिद्र्य कल्पनेचेही

प्रकाशन दिनांक :- 14/12/2003
आपला देश गरीब आहे, असे आपण म्हणतो, सगळेच म्हणतात. स्वत:च्या नाकर्तेपणाला गरिबीच्या गुळगुळीत आवरणाखाली झाकण्याचा आपला प्रयत्न असतो आणि त्यात आपण बऱ्याच प्रमाणात यशस्वीसुद्धा झालो आहोत. ‘गरीब’ या शब्दातून ध्वनित होणारा अर्थ हेच सांगतो की, एखाद्या विवशतेमुळे, बाह्य संकटामुळे आलेली ती एक अपरिहार्य अवस्था आहे.
[…]

हे राष्ट्र घोटाळ्यांचे!

प्रकाशन दिनांक :- 07/12/2003

वर्तमानपत्रात बातम्यांना स्थान देताना साधारणपणे त्या बातम्यांचे महत्त्व पाहिले, तपासले जाते. सर्वाधिक महत्त्वाच्या बातमीला पहिल्या पृष्ठावर वरच्या भागात प्रसिध्दी मिळते. वृत्तपत्रीय क्षेत्रात प्रचलित असलेल्या भाषेत अशा बातमीला ‘लिड’ म्हणतात.
[…]

कोंडी झालेला उद्द्धस्त भारत

प्रकाशन दिनांक :- 30/11/2003

एखाद्या गोष्टीचे यथार्थ, वस्तुनिष्ठ मूल्यमापन करायचे असेल तर केवळ त्या गोष्टीच्या बाह्यरंग, रूप, आकारावरून कधीच करता यायचे नाही. तसा प्रयत्न केला तर हाती येणारा निष्कर्ष हमखास चुकू शकतो. एखादे साधे बीज असेल तर ते सकस आहे, चांगल्या प्रतीचे आहे, त्याचा वाण उत्तम आहे, हे केवळ ते बी हातात घेऊन सांगता येणार नाही.
[…]

1 36 37 38 39 40 44
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..