नियंत्रण की मुस्कटदाबी?
प्रकाशन दिनांक :- 23/11/2003
शासनव्यवस्था कुठलीही असो, ती कोणत्याही एकाच घटकावर अवलंबून नसते किंवा त्या व्यवस्थेच्या सुचारूपणाला कोणताही एकच घटक जबाबदार नसतो. अगदी हुकुमशाही असली तरी हुकुमशहाला सैन्याची, मुलकी अधिकाऱ्यांची मदत घ्यावीच लागते. परस्परांशी संबंधित अशा अनेक घटकांनी मिळूनच कोणतीही शासन व्यवस्था प्रभावीपणे कार्य करू शकते, यशस्वी होऊ शकते.
[…]