महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यालय मुंबईतून पुण्यात हलवण्यात आल्यावर मुंबईतही तशी एक मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणारी संस्था असावी, असा ठराव १९३४ सालच्या साहित्य संमेलनात करण्यात आला. त्याच्या फलस्वरूप २१ जुलै, १९३५ रोजी मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना करण्यात आली. संस्थेचे पहिले कार्यालय संस्थापक डॉ अ.ना.भालेराव यांच्या गिरगावातील नारायण – सदन या निवासस्थानी सुरु झाले. […]
सांताक्रुझ मुंबई येथील द योग इंन्स्टिट्युट ही एक फार जुनी योग संस्था आहे. तिच्यामागे सत्त्याण्णव वर्षांची परंपरा आहे. सांताक्रुझ रेल्वे स्थानकाजवळच गर्द झाडीने वेढलेल्या परिसरात या संस्थेची वास्तू उभी आहे. तिची स्थापना १९१८ साली मणी हरिभाई देसाई उर्फ योगेंद्रजी यांनी केली. सुरूवातीच्या काळात ही संस्था वर्सोवा येथील दादाभाई नौरोजी यांच्या द सॅण्डस् या बंगल्यात सुरू झाली. १९४७ साली ती सांताक्रुझ येथील सध्याच्या जागेत स्थलांतरित झाली. […]
वस्तुसंग्रहालय म्हणजे ऐतिहासिक ठेवा जतन व संवर्धन करण्याचे ठिकाण होय. ‘वस्तुसंग्रहालय’ या संकल्पनेचा उगम युरोपमध्ये झाला. इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांड्रीयामधील टॉलेमी राजाने आपल्या राजवाड्यात पहिल्यांदा वस्तुसंग्रहालय सुरू केले. या राजवाड्यातच अलेक्झांडर द ग्रेट यांचा ग्रंथसंग्रह ठेवण्यात आला होता. परंतु ग्रीक लेखक पॉसॉनियस यांच्या माहितीनुसार इ.स. दुसऱ्या शतकात अथेन्स शहरात एका मोठ्या दालनात काही पेंटिंग्ज सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवलेल्या होत्या. ही प्राचीन काळातील सार्वजनिक वस्तुसंग्रहालयाची सुरुवात होती. […]
ही कथा आहे जवळजवळ सत्तर वर्षांपूर्वीची. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या पोलीस खात्यामध्ये काम करीत असलेल्या पुंडलिक रामचंद्र निकम नावाच्या कॉन्स्टेबलची, म्हणजेच परमपूज्य हठयोगी निकम गुरुजी यांची. त्यावेळी कोणाला कल्पनाही नसेल की ही व्यक्ती किती महान बनणार आहे व केवळ स्वकर्तृत्वाचे बळावर योग क्षेत्रामध्ये आपली छाप पाडणार आहे. […]
उद्योगधंद्यांत प्रसिद्धी मिळविलेल्या व्यक्तींनी विविध क्षेत्रांत, समाजाची सेवा करावी व अशी सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे म्हणून स्थापिलेली एक आंतरराष्ट्रीय नागरी संस्था. भूतदया, मानवतावादी व शैक्षणिक प्रकल्प यांच्या माध्यमातून विविध राष्ट्रांतील नागरिकांमध्ये सामंजस्य व मैत्री यांची जोपासना वृद्धिंगत व्हावी, हा रोटरी संस्थेचा मुख्य उद्देश मानला जातो. […]
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ लोकमान्य टिळक यांनी पुरस्कारिलेले राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या विद्यापीठात नेहमीच्या कॉलेजच्या विषयांखेरीज संस्कृत आणि आयुर्वेद शिकविले जाते. अनेक वर्षांपासून या विद्यापीठातर्फे संस्कृतच्या परीक्षा घेण्यात येतात. विद्यापीठातर्फे दरवर्षी नारळी पौर्णिमेला संस्कृत दिनानिमित्त लोकमान्य टिळक यांच्या नावाचा संस्कृत पुरस्कार देण्यात येतो. […]
असे शब्द कानावर पडले की सुरू होते एखादी सुरेल मैफल , एखादं संगीत नाटक , एखादं गद्य नाटक , एखादी संगीत स्पर्धा किंवा एखादं प्रशिक्षण शिबीर …आणि सगळ्याच वयोगटातील रसिक आतुरतेनं समोरच्या रंगमंचाकडे पाहू लागतात. हे आजचं नाही . गेली २५ वर्षे अव्याहतपणे , अविरत सुरू आहे संगीताचा अवीट प्रवाह. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी मैफल रंगत असते . […]
कोकणातील शेती, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय यांचा विकास करुन येथील ग्रामीण लोकांची आर्थिक उन्नती करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १८ मे १९७२ रोजी दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केली. त्यावेळी या विद्यापीठाकडे दापोलीचे कृषी महाविद्यालय, मुंबईचे पशुवैद्यक महाविद्यालय आणि कोकणातील १६ संशोधन केंद्रे होती. […]
संपूर्ण पारतंत्र्याच्या काळात पं. विष्णू दिगंबर पलुसकरांनी लाहोर शहरात गांधर्व महाविद्यालयाची केलेली स्थापना ही एक संपूर्ण स्वतंत्र घटना होती आणि पुढे त्यांच्या शिष्य-प्र-शिष्यांच्या रूपानं आणि देशात ठिकठिकाणी गांधर्व महाविद्यालयाच्या शाखांच्या रूपानं हेही दिसून आलं की, या कार्याचा व्याप एखाद्या विद्यापीठासारखाच आहे. […]
ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला पां. के. दातार यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. […]