नवीन लेखन...

महाराष्ट्रातील विविध संस्थांची माहिती देणारा विभाग

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (नॅशनल डिफेन्स अकॅडेमी) स्थापना दिन

सैनिकी प्रशिक्षण देणारी भारतातील एक महत्त्वाची संस्था. पुणे शहराजवळ खडकवासला येथे ही संस्था असून तिन्ही सैनिकी दलांचे प्राथमिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची सोय या संस्थेत आहे. भूसेना, नौसेना व वायुसेना या दलांतील अधिकाऱ्यांचे शिक्षण सुरुवातीस एकत्र केले जावे, या उद्देशाने १९४५ साली तत्कालीन हिंदुस्थान सरकारने नॅशनल वॉर अकॅडेमी वर्किंग कमिटी नेमली. या कमिटीचे अध्यक्ष फील्ड मार्शल सर […]

‘आरंभ’ एका यशोगाथेचा !

१४ ऑक्टोबर, २०१४ चा हा माझा लेख. ‘आरंभ’ च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त पुन्हा पोस्ट करतो आहे. फेसबुकच्या कृपेने औरंगाबादमधील एका संस्थेचा त्रोटक परिचय झाल्यापासून ती संस्था सतत मला खुणावत होती. तिच्या विविध उपक्रमांची माहिती वाचत असतांना ‘ऑटिस्टिक’ या शब्दाचा आयुष्यात प्रथमच परिचय झाला. दुर्बलमनस्क, मतिमंद हे शब्द अगदी शाळकरी वयापासून कानावर पडले होते. ज्यांच्या घरात अशी […]

सर परशुरामभाऊ महाविद्यालय (S P College) – १०० वर्षांचा इतिहास

पुण्यातल्या प्रत्येकच रस्त्याला त्याची स्वतंत्र राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशी ओळख आहे. त्यातलाच एक रस्ता म्हणजे टिळक रस्ता. टिळक चौक आणि स्वारगेट यांना जोडणाऱ्या या रस्त्यावर न्यू इंग्लिश स्कूल, साहित्य परिषद, टिळक स्मारक, अभिनव कला महाविद्यालय, हिराबाग चौक, या वास्तूंच्या बरोबरीने एक वास्तू दिमाखदारपणे उभी असलेली दिसते ती म्हणजे सर परशुरामभाऊ महाविद्यालय. बाहेरून जाणारे काहीजण कुतूहलाने, काही जण नॉल्टेजिक होऊन आणि काही जण इथे येण्याच्या स्वप्नाळू नजरेने त्या दगडी इमारतीकडे बघतात. […]

सोशियल सर्विस लीग, एक सेवाभावी संस्था

सर नारायण गणेश चांदवडकर, श्री भालचंद्र कृष्णा भाटवडेकर, श्री गोकुळदास के. पारेख, सर जमशेटजी जीजीभॉय आणि इतर अनेक नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांनी गिरणी कामगारांचा सामाजिक स्तर उंचावा, गरिबी संपावी, त्यांना चांगले माणूस होता यावे म्हणून १९ मार्च, १९११ रोजी त्यांनी ‘सामाजिक सेवा लीग’ अशी अद्वितीय सेवाभावी संस्था स्थापन केली. लीगचे पहिले सचिव म्हणून श्री एन.एम. जोशी यानां मान देण्यात आला. […]

धारावीचं संगीत गुरुकुल

मुंबईतल्या धारावी येथील, गरीब मुलांना संगीत विषयाची गोडी उत्पन्न व्हावी तसंच संगीत वाद्य शिकता यावीत यासाठी धारावी येथील इंदिरा नगरच्या गुरुकुल ट्रस्टने जानेवारी २०१२ पासून गरिब विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत कमी किमतीत शिकता यावे या उद्देशाने ही संधी उपलब्ध करुन दिली आहे.
[…]

सहकारी तत्वावरील मासेमारी

महाड जिल्ह्यातील रायगड येथील आदिवासींचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे नदीतील मासेमारी. पण नद्यांवर धरणं बांधली गेल्याने तेथील मच्छीमारीवर मर्यादा आल्या. पोटापाण्यासाठी आदिवासी स्थलांतर करू लागला. २००५ मध्ये आलेल्या पुरामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. त्या वेळी कोयनानगर सातारा येथील श्रमजीवी संघटना त्यांच्या मदतीला धावली. मच्छीमारीतून त्यांना उत्पन्न कसे मिळवता येईल, याबाबत त्यांनी विचार सुरू केला. पूर्वी दोन आदिवासी […]

सामाजिक बांधिलकी जपणारी – “फ्रीमेसनरी”

“जगात अनेक सामाजिक संस्था अशाही आहेत ज्या कित्येक वर्षापासून कोणताही अपेक्षेशिवाय व कार्याचा बोलबाला न करता केवळ मानवतेच्या हितासाठी तसंच तळागाळातील उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटीबध्द आहेत. “फ्रीमेसनरी” ही ५०० वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये स्थापन झालेली आणि भारतात २५० वर्षापासून कार्यरत असलेली सर्वधर्मसमभाव मानणारी आणि समाजहितासाठी तत्पर असणारी संस्था. या संस्थेच्या कामाचं स्वरुप, उद्दिष्टांविषयी माहिती करुन देण्यासाठी नुकतंच मुंबईतल्या फोर्ट येथील “फ्रीमेसन हॉल” येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्ताने भारतात ”फ्रीमेसनरी” चं समाजकार्य कशाप्रकारे सुरु आहे त्याचा हा वेध.” […]

राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे

१९२२ साली एका खोलीच सुरू झालेला हा अद्भुत संग्रहालय संसार वाड्याच्या वाड्याच्या सार्‍या दालनातून फोफावला आणि कीर्ती सुगंध तर परदेशातही दरवळला. राणी एलिझाबेथ यांनीही हे वैभव पाहून आनंदोद्गार काढले होते. […]

सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची रौप्यमहोत्सवी घौडदौड

युवकांना प्रशासकीय सेवेसंदर्भात अचूक मार्गदर्शन करण्यासाठी ठाण्यामध्ये चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची स्थापना झाली. प्रशासकीय सेवेमध्ये करियर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ही संस्था चालविण्यात येते.
[…]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..