नवीन लेखन...

श्री स्वामी समर्थ

पूजन चिंतन चरणी माथा गजानना श्री स्वामी समर्था गजानना श्री स्वामी समर्था तारिल भवसागर गाथा गजानना श्री स्वामी समर्था दीन हिनांचा एकच त्राता गजानना श्री स्वामी समर्था करिशी कृपाळू दृष्टी भक्ता गजानना श्री स्वामी समर्था चराचराचा पालनकर्ता गजानना श्री स्वामी समर्था भक्तिचा तू खराखुरा भोक्ता गजानना श्री स्वामी समर्था चिंता नच पाठिशी तू असता गजानना श्री स्वामी समर्था घेऊया नाम […]

चिता

जिथे वेचला प्राजक्त तिथे गोवऱ्या नशिबी आल्या कोमल निशिगंधाच्या पाकळया नजरेसमोर चोरीला गेल्या कुठे मागावी दाद फिर्याद सुगंधच फितूर झाला बघता बघता चोराच्या श्वासात तो सामावला शुन्य नजर,मती गुंग, बधिर मी स्वतः ला हरवून बसलो स्वतः च पेटवलेल्या चितेत धुमसत जळु लागलो © अरविंद टोळ्ये ९८२२०४७०८०

नातं

नातं जिवा-भावाचं सढळ…..अढळ ! नातं प्रिती-प्रेमाचं रसाळ …..मधाळ ! नातं राग-लोभाचं खट्याळ…..स्नेहाळ ! नातं दुःख – हर्षाचं उदास …..उधाण ! नातं विरहात एकटे व्याकुळ ! नातं मनांत सूर गात्रात ! नात्याची गुंफण रेशमी….रेशमी ! बंध रेशमाचे अखंड….अतूट ! कस नात्याचा झळाळे सुवर्ण ! पाईक नात्याचा पवित्र ….पावन ! बाज नात्याचा मस्त उनाड ! साज नात्याचा प्रेम […]

प्रेम

प्रथम तिज पहाता अग्नी मनी चेतला , झालो बेधुंद मी अंतरी वणवा पेटला ! आर्त नजर तिची मन घायाळ करून गेली एकमेकात गुंतलो आम्ही …. मनोदेवता सांगून गेली ! खट्याळ चमक तिच्या नेत्री स्वर्ग सुख पाझरले गात्री त्या क्षणी गेलो हरवून ती माझी,मी तिचा बनून ! होऊनी एकाकी जेंव्हा .. मोजतो अंधारी तारे , अलगद चाहुलीने तिच्या फुटती नवे धुमारे ! जेंव्हा दुखी बुडे आकंठ उरे जीवनी नुसती खंत पुरे  तिची चाहूल आगळी जीवनी येई नवी झळाळी ! क्षणो क्षणी वाटत राही तिच्यात मी सहचरी पाही झाले  दूर सगळे अज्ञान जुळता, तिचे मन माझे मन ! © अरविंद टोळ्ये ९८२२०४७०८० आपल्या अभिप्रायाचे स्वागत. आवडली असेल तर नावासह जरूर शेअर करा.

वेदना

भेट तिची माझी थेट नभ-धराची सुख क्षण भराचे आस जीवनाची भेटण्यासाठी,प्राण गोळा कंठी आठवांचा ताटवा,असे सदा सोबती सुगंधीत मन जसे,कूपी अत्तराची कोणास वदाव्या,दिलाच्या वेदना कोण घेईल समजून,माझ्या यातना माणसाचे जग की,दुनिया पत्थराची जीव लावणाऱ्याचा,जग घेते जीव कां तरी ह्या उरी,असे रूजे बिज कोठे रिती करावी,व्यथा अंतरीची भावना अनावर होती,सांज सकाळी बावऱ्या मनाला, नच सुचे काही जीवघेणी […]

कविता

मी कविता का लिहितो हे मला खरंच कळत नाही.. मीच, मला घातलेलं कोडं कांही केल्या सुटत नाही ! कारण जिच्यासाठी मी रात्रीचा दिवस करतो, आणि लिहितो, तिच्या पर्यंत त्या कधीच पोहोचत नाहीत.. आणि माझ्या व्याकुळ मनाची परत घालमेल नको, खपली निघायला नको म्हणून, मी ही त्या परत वाचत नाही.. तरी हि मी लिहितो….. का लिहितो कळत […]

अन्नपूर्णा

जेंव्हा जेंव्हा  प्रवासाने आम्ही दोघे दमलेलो असतो …….. थकून, कंटाळून घरी येतो, झोमॅटो तिला नको असतं, म्हणून पिठलं भाताचा साधा बेत ठरवते ! माझी आवड सांभाळून ती सांडगे पापड़ हि तळते ….. त्यासोबत  न विसरता लोणच्याची फोड वाढते कारण आम्ही दोघे दमलेले असतो तेंव्हा खरंच पिठलं भात असा साधाच बेत असतो ! कैरी लिम्बाचे लोणचे …. […]

पांढरपेशी

एक पांढरी पाल वर वर चढायची ….. मनात माझ्या खोल … खोल जखम करायची जखम रक्ताळलेली चिघळत रहायची … पालीच्या चुक्चुकण्याने खपलीहि निघायची त्या पालीचे सगे सोयरे करीत मौज जमायचे स्वार्थाच्या तलवारीने पंख माझे छाटायचे ….. अपंग मी, गलितगात्र, वेदनेने विव्हळायचो पालीच्या छद्मीहास्याने गुदमरून मरायचो, आता…….. हुंकार मी भरला आहे नागफणी   बनणार   आहे न्याय हक्क मिळवून […]

विठु…..

तुझी गळाभेट तर राहू दे! तुझं दर्शनास तर येऊ दे! तुझे निमिषार्धाचे नेत्र सुख दे! तुझी वारी मनांतच तर रुजु दे!! नामा वाट पाहे देवा अतुरतेनी घास दहीभाताचा करी धरोनी तुकयाचा कंठ अभंगे दाटुन आला सुख झाले ओ साजनी गातांना !! सावता म्हणे देवा फुलं कोमजली थकलो रे विठु तुझी पाऊले शोधून जना म्हणे देवा राहिले […]

मैत्र

मैत्र बनून आलीस जीवनी न्हवते कधी ध्यानी-मनी गुंफून स्नेहाचे धागे रेशमी व्यापलीस तू , माझी अवनी ! कधी राग, कधी लोभ कधी चिडू, कधी गोडू कैरीची लज्जत, हापुसी गोडवा दिलास मैत्रीला,आयाम नवा ! शांत सुखी जीवन सागरी आली कैक तुफानी वादळे भिरभिरती नौका सांभाळत उभी तू, जणू दैवी सुकाणू ! नाही कसला गर्व, तुला निरागस स्नेहाचा, […]

1 98 99 100 101 102 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..