मैनेचे मातृहृदय
आम्रवनांतील शोभा बघत, भटकत होतो नदी किनारी मैनेची ती ओरड ऐकूनी, नजर लागली फांदीवरती…१ एक धामण हलके हलके , घरट्याच्या त्या नजीक गेली पिल्लावरती नजर तिची, जीभल्या चाटीत सरसावली…२, मैनेच्या त्या मातृहृदयाला, पर्वा नव्हती स्वदेहाची जगावयाचे जर पिल्लासाठी, भीती न उरी ती मृत्यूची…३ युक्त्या आणि चपळाईने, तुटून पडली त्या मृत्यूवरी रक्त बंबाळ ते केले शरीर, चोंच […]